तळा चरई आदीवासीवाडीवर तहसिलदारांची तातडीची मदत,तर समाजसेवक कृष्णा महाडीक घर बांधून देणार?

 न्यूज आज तक मराठीच्या पाठपुराव्याला यश! 

तळा( कृष्णा भोसले ) रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील चरई आदीवासीवाडीवर 19मे रोजी पहाटे 4:15 वाजता भिंत कोसळुन आदिवासी मुलगी जागीच ठार तर अन्य तीन जण जखमी झाल्याची बातमी न्यूज आज तक मराठीने सर्वप्रथम दिली होती या बातमीचा विविध अधिकाऱ्यांनी  समाजसेवकांनी दखल घेतली असून आदिवासी कुटुंबावर कुटुंबावर झालेल्या दुःखद घटनास्थळी तातडीने धाव घेत त्यांना तातडीची स्वखर्चातुन मदत करणारे तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांनी कुटुंबाला थोडाफार आधार दिला असून रायगड भूषण समाजसेवक कृष्णा महाडिक हे या कुटुंबाला घर बांधून देण्यास मदत करणार आहेत.

     कुटुंबांवर झालेला हा आघात कधिही भरून न निघणारा आहे.त्यात एक आठ वर्षांची मुलगी दगावली असुन अन्य जखमींवर उपचार चालू आहेत.अशा कुटुंबाला सावरण्यासाठी शासकीय मदतीची गरज आहे.जे जे काय देता येईल ते सुद्धा पहाण्याचीगरज असल्याचे अनेकांच्या तोंडून शब्द निघत आहेत.

 आदिवासी विकास प्रकल्प अधिकारीनीं भेट न दिल्याने रायगड जिल्ह्यात आदिवासींमध्ये होतोय संताप व्यक्त : उमेश जाधव

 रायगड जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आदिवासींच्या विकासासाठी कटिबद्ध आहे या खात्यामध्ये आदिवासींच्या विकासासाठी  करोडो रुपये  विकासासाठी येत असतात तसेच आदिवासी समाजावर एखाद्या वेळी कोणतीही वाईट परिस्थिती उद्भवली तर आपत्कालीन काळात आदिवासींना मदत देण्याची सुद्धा व्यवस्था आदिवासी विभागाकडे करण्यात आलेले आहे सदर घटना होऊन दोन दिवस उलटले तरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथील एकही अधिकारी तळा तालुक्यातील चरई या वाडीमध्ये मध्ये पोहोचला नसल्याची खंत दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश जाधव यांनी व्यक्त केली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची निषेध करून सदरील कुटुंबाला मदतीची मागणी केली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला जात असल्याची माहिती दक्षिण रायगड आदिवासी हीत रक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.


Comments

Popular posts from this blog