जग तारण्याचे कार्य अखंडितपणे संतांनी केले:- ह.भ.प.भरत महाराज जोगी
   गोवे-कोलाड (विश्वास निकम ) ज्या ज्या वेळी  जगावर संकटे आली त्याच्या वेळी जगाला तार ण्याचे महान कार्य संतांनी केले. जग भरपूर पुढे गेला आहे कि आता पायात बुटे घालून जेवायला लागला आहे आता पन्नास टक्के सुधारला आहे.दहा वर्षानंतर हे बुटात भात घेऊन खातील म्हणजे शंभर टक्के सुधारले.कपडे सुधारले कडक इस्त्रीचे कपडे हजार लफडे, बोली भाषा सुधारली आपले दुर्भाग्य आहे. भगवंतांचे एवढे उपकार आहेत हा देह त्यांनी बनविला व संतांनी भगवंताची ओळख करुन दिली म्हणून जग सुधारण्याचे कार्य संतांनी केले असे प्रतिपादन ह.भ.प.भरत महाराज जोगी बीड,परळी वैजिनाथ यांनी केले.

आतां तुम्ही कृपावंत l साधूसंत जिवलग ll१ll गोमटे ते करा माझे l भार ओझे तुम्हासी ll२ll वंचिले पाया-पाशी l नाही याशी वेगळे ll३ll तुका म्हणे सोडविल्या गाठी दिली मिढी पायासी ll ४ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट केले.

  म्हणून ज्ञानदेवा सारखा संत नाही,ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदाया सारखा पंथ नाही.बाकी आले तसे गेले हा मात्र अनाधिकाळापासून जशाच तसे आहे यावेळी ह.भ.प. मारुती महाराज कोल्हाटकर,गायनाचार्य रविंद्र मरवडे, वैभव खांडेकर, मृदूंगमणी ज्ञानोबा महाराज दळवी,नंदू महाराज तेलंगे,अक्षय ओव्हाळ, सुनिल भऊर, हरिचंद्र धामणसे,पांडुरंग दळवी, गंगाराम दळवी, किरण ठाकूर, गणेश दिघे,राजा म्हसकर व कोलाड परिसरातील असंख्य वारकरी उपस्थित होते.

 या अगोदर भैरी भवानी बापदेव जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्ताने सोमवार दि.१६ मे रोजी श्रींची मिरवणूक, मंगळवार दि.१७ मे रोजी गणपती पूजन, पुण्याहवाचन,अभिषेक,होम हवन, देवाला धान्यधिवास, कळस पूजन, बुधवार दि.१८ मे रोजी होम हवन, देव स्थापना, कळसरोहन सोहळा, महापूजा,किल्ला व कोलाड विभागीय वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आ.अनिकेत तटकरे,व कोलाड परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

      सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मांडळुस्कर,अनंत सानप,चंद्रकांत फाटे, हरिचंद्र कदम, सुनिल दळवी,अशोक धामणसे,मधुकर दिसले, विठ्ठल पवार, राजु लहाने, दत्ताराम जोशी, विठोबा सानप, सुधाकर दिसले चंद्रकांत लहाने,डॉ, सागर सानप, डॉ. सुजित दिसले, सचिन दिसले,उमाजी आंब्रुस्कर,समिर पडवळ,बबन दळवी, अजित लहाने, दिनकर सानप, ज्ञानेश्वर दळवी समस्थ ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग  महिला मंडळ यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog