तळा पंचशील विकास संस्थेच्यावतीने गरिब गरजू विद्यार्थ्याना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात सपंन्न
तळा (कृष्णा भोसले) किरणशेठ देशमुख सभाग्रह येथे समाजातील नोकरी व्यवसाय नसलेल्या बांधवाच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ई.पहिली ते दहावी विद्यार्त्यांसाठी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने सन्मानिय अध्यक्ष मा. एन के. जगताप यांच्या अध्यक्षते खाली अतिशय स्तुत्य आणी प्रेरणार्थक उपक्रम प्रथमच हाती घेन्यात आला आहे.याचाच शुभारभं म्हणून 22 तारखेला. याची सुरुवात करण्यात आली आहे.
महामानवाच्या प्रतिमेस वंदन करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन सदर कार्यक्रम सुरु झाला. याच अनुषगांने कोरोनाच्या कठिण काळात सुद्धा महिला बचत गटाच्यावतिने 95 सभासद बनवून समाजातील भगिनींना अर्थिक सहाय्यानें ऊभे रहाण्याची शक्ती दिली तसेच दिड लाखाची पुंजी ऊभी केली याबद्द्ल त्यांचे सुद्धा कौतुक करन्यात आले तसेच पुढिल वाटचालीस चालना देण्यात आली सदर कार्यक्रमास तालुक्यातिल अनेक क्षेत्रातिल मान्यवर तसेच ग्रामस्थ मान्यवर महिला भगिणी मोठ्या संखेने उपस्थित होते प्रमुख मान्यवर म्हणून तळा नगर पंचायतीचे ऊपनगराध्क्ष मा चंद्रकांत रोडे, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष विजय तांबे, प्रोफेसर भिमेश भेकरे,अँड प्रबुद्ध माळी,प्रकाश नाक्ते तसेच संस्थेचे पदाधिकारी, महिला भगिनी उपस्थित होते या सर्वमान्यवरांचे उपस्थित समाज बंधुभगिनींना व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमात कु.तन्वी गवाणे रहाटाड,कु करिना मोरे -मेढा ईत्यादी मुलांना शालेय साहित्याचे वाटप करन्यात आले.सदर कार्यक्रम सपंन्न करन्यासाठी भागुराम भेकरे, जा. जाधव. मोरे,नाक्ते, गायकवाड तसेच महिला भगिनी यांनी अतिशय मोलाच सहकार्य केले.
Comments
Post a Comment