पाण्याचा इतर स्रोत नसल्याने महिलांना जीव मुठीत धरून आणावे लागते पाणी!

तळे तालुक्यातील कोंडखोल आदिवासी बांधवांची व्यथा!

तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील कोंडखोल आदिवासी वाडी येथे असलेली विहीर धोकादायक स्थितीत असून या विहिरीमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोंडखोल आदिवासीवाडी येथे पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे.वाडीत पाण्याच्या नळाची व्यवस्था नाही.कोणताही धरण अथवा तलाव नाही पाण्याचा कोणताही स्रोत नाही.वाडीत केवल दोन विहिरी असून त्यातील एका विहीरितील पाणी उन्हाळ्यामुळे आटले आहे.तर दुसऱ्या विहिरीत पाणी आहे परंतु विहीर धोकादायक स्थितीत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. कोंडखोल येथील आदिवासी महिलांना पाण्याचा इतर पर्याय नसल्यामुळे जीव मुठीत धरून या विहिरीतून पाणी आणावे लागत आहे.

त्यामुळे प्रशासनाने कोंडखोल आदिवासी वाडीसाठी पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणी येईल अशी व्यवस्था करावी किंवा एखादी बोअरिंग मारून द्यावी अशी  मागणी येथील  खोंडकोल आदिवासी बांधवांनी केली आहे.येथील विहीर धोकादायक स्थितीत असूनही पाण्याचा ईतर स्रोत नसल्याने महिलांना जीव मुठीत धरून आणावे लागते पाणी लागते.

Comments

Popular posts from this blog