तळा नगर पंचायत पाणी,विज प्रश्नावरुन भाजपा नेते रविभाऊ मुंढे पत्रकार परिषदेत कडाडले?

    भाजपातर्फे साखळी उपोषणाचा इशारा!

ळा (कृष्णा भोसले) नगर पंचायत हतळाद्दीतील पाणी,विज प्रश्नावरुन भाजपा नेते रविभाऊ मुंढे कडाडले असुन येत्या काही दिवसांत भाजपा तर्फे साखळी उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.तळा शहराला नव्याने पाणीपुरवठा योजना व्हावी.यासाठी आम्ही नगरपंचायत सत्तेत असताना प्रयत्न करुन ९९ टक्के काम जवळपास मंजुरी साठी पुर्णत्वास आले नगरपंचायत निवडणुका आचार संहितेत हे काम थांबले पण आजतागायत हे काम काहोत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या कामांचे श्रेय तुम्ही घ्या परंतु  जनतेला पिण्याचे पाणी मुबलक मिळु द्या.असेही त्यांनी म्हटले.या कामात पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आम्हाला मंत्रालयात या कामी मदत केली हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.तळा शहरात रस्ते विकास महामंडळाच्या दिघी पोर्ट कडे जाणारा रस्ता होत असताना त्यांच्या सहकार्याने हायमिस्टदिवे चौदा पोल उभारुन लावण्यात आले आहेत.परंतुहे दिवे सुरू केल्यास यांचे लाइट बिल कोण भरणारअसा प्रश्न निर्माण करून आजपर्यंत हे दिवे सुरू केले नाहीत.हे सुरू झाल्यास शहराची शोभा वाढून शहर प्रकाशमय होईल परंतु हे केले जात नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

   नगरपंचायत मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी नगराध्यक्षा दररोज किमान ११ ते १ यावेळेत उपस्थित असणे गरजेचे आहे परंतु त्या उपस्थित रहात नसल्याने सामान्य नागरिकांची कामे रखडली जातात.त्यांनी नगरपंचायत मध्ये उपस्थित असणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली आहे.विजेची भरमसाठ बिले ही ग्राहकांची लुक आहे.त्यामुळे धंदेवाईक हैराण झाले आहेत.मुबलक पाणी नसल्याने शहरात रहाणे अनेक लोक टाळतात.त्यामुळे याचा परिणाम बाजारपेठेवर होत असून याबाबतअनेकप्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली.याबाबत कारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भाजपाच्या वतीने लवकरच साखळी उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

   या पत्रकार परिषदेला भाजप नेते रविभाऊ मुंढे यांचे समवेत माजी नगराध्यक्ष रेश्मा मुंढे,भाजपा तळा तालुका अध्यक्ष  ॲडव्होकेट निलेश रातवडकर, भाजपा युवा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रितेशभाई मुंढे उपस्थीतीत होते.

Comments

Popular posts from this blog