ह.भ.प.गुरुवर्य राम महाराज आंबेकर यांना रायगड भूषण  पुरस्कार प्रदान

           गोवे-कोलाड (विश्वास निकम )ह.भ.प. गुरुवर्य राम महाराज आंबेकर यांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणाला रायगड भुषण पुरस्कार राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे,रजिप अध्यक्षा योगिता पारधी, बांधकाम सभापती निलिमाताई पाटील यांच्या सुभेहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

                  ह.भ. प. गुरुवर्य राम महाराज आंबेकर यांनी आध्यत्मिक क्षेत्रात केलेल्या प्रबोधनात्मक कार्याबद्दल त्यांना रायगड भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मूळ गाव गंधारपाडा महाड येथील असणारे व अनेक वर्षांपासून पुई कॉलनी येथे वास्तव्याला असणारे राम महाराज यांनीi कोलाड परिसरात आपल्या कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनाचे काम केले आहे तसेच त्यांनी पुई गावातील तरुणांना हरिपाठा विषयी ओढ निर्माण केली आहे.तसेच त्याच्या नेतृत्वाखाली पुई ते पंढरपूर पायी दिंडी अनेक वर्षांपासून नित्यनेमाने जात आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रबोधन कार्याबद्दल त्यांना रायगड भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

               यावेळी अशोक धामणसे, संजय मांडळुस्कर, सिद्धार्थ गायकवाड, चंद्रकांत लहाने,अनंत सानप, विठ्ठल पवार, प्रवीण धामणसे, सुनिल दळवी, शरद दिसले, चंद्रकांत फाटे, बाळा आंब्रूस्कर,तसेच समस्त पुई ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी ह.भ.प.राम महाराज आंबेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog