महागाव येथे विठ्ठल रखुमाई प्राणप्रतिष्ठापना हरिनाम सोहळ्याचे औचित्य साधून दहावी आणि बारावी मध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव! 

 इंदापूर (प्रतिनिधी)महागांव येथे विठ्ठल रखुमाई प्राण प्रतिस्थापना एक दिवसीय हरिनाम सोहळ्याचे औचित्य साधून दहावी आणी बारावी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री.गणेश साळवी व श्री.प्रसाद साळवी या साळवी बंधूनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता.

 यामध्ये महाड येथील राजीवली मधिल विद्यार्थी कु.सागर संतोष साळवी याने बारावी सायन्स मध्ये ९५.८४% गुण मिळवून यश संपादन केले.तर आसरे-कासारवाडी येथील सध्या महाड येथे राहणारी कुमारी.सानिया लहु मांगले हीने ९१.४०% मिळवलेया दोघांचा ह.भ.प मारुती महाराज कोल्हाटकर यांच्या हस्ते भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कु.सागर यांच्या वतीने त्यांचे काकांनी पुरस्कार स्विकारला त्या विध्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी श्री.गणेश सदाशिव साळवी यांनी मराठी विषयात ९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांस अँड्रॉईड मोबाईलचे बक्षिस जाहीर केले होते ते बक्षिस देखील कु.सानिया लहु मांगले हीने मराठी विषया मध्ये ९६ गुण मिळवून पटकावले तिचा सत्कार ह.भ.प मारुती महाराज कोल्हाटकर व अ.भा.मध्यवर्ती मंडळाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष , कासार उद्योजक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी साळवी यांच्या हस्ते झाला.

मराठी भाषा संवर्धन व मुला मध्ये आपल्या मातृभाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी श्री.गणेश साळवी यांनी यापुढे दरवर्षासाठी आकर्षक सन्मानचिन्ह देण्याचे जाहीर केले आहे.

Comments

Popular posts from this blog