कृष्णा चाळके यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान
तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील कर्नाळा गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चाळके यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या 2020-21 चा गुणीजनानां रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या समारंभात कलावंत म्हणून त्यांना पुरस्कार,स्मृतीचिन्ह, मानपत्र , पुष्पगुच्छ देऊन त्यांचा राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी माजी आ.पंडीतशेठ पाटील, विधानपरिषद शिक्षक आमदार बाळाराम पाटील,जि.प.महीला बालकल्याण सभापती गिताताई जाधव,जि.प.सदस्य बबन चाचले आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात डफाच्या लावण्या आपल्या पहाडी आवाजात गाऊन लोकजागृती चे काम केले आहे.त्याच्यां या कामगिरीबद्दल कलावंत पुरस्कारामिळाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून त्यांनावर शुभेच्छा चां वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment