गोविंदशेठ भोईर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील खैराट गावचे सुपुत्र गोविंदशेठ नारायण भोईर यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.चरई ग्रुप सोसायटीचे चेअरमन श्री गोविंद नारायण भोईर, मु. पो. तळा यांना रायगड जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा रायगड भूषण पुरस्कार आज अलिबाग येथे प्रदान करण्यात आला.
शिक्षक आ.बाळाराम पाटील, माजी आमदार पंडीतशेठ पाटील,यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी राज्य मंत्री अदिती तटकरे, तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड,व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी यांचे साठी कांहींतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर अशी ज्यांची ओळख आहे.अशा व्यक्तींला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment