पत्रकार विश्वास निकम रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित

खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील गोवे गावचे सुपुत्र पत्रकार विश्वास सखाराम निकम यांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा रायगड भूषण पुरस्कार राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे, रजिप अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे,बांधकाम सभापती निलिमाताई पाटील आ.बाळाराम पाटील,माजी आ.पंडीतशेठ पाटील,मुख्याधिकारी डॉ किरण पाटील, यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

       विश्वास निकम यांनी सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा काम केले आहे. याशिवाय त्यांनी गावाकमेटीचे सचिव, उपाध्यक्ष, शालेय शिक्षण समितीवर अध्यक्ष, तसेच तंटामुक्ती समिती,ग्राम स्वछता अभियान, या कमेटीवर काम केले, त्याच बरोबर आदिवासी समाजाच्या जनहिताचे काम केले आहे. तर कोरोना काळात रायगड जिल्हा विविध संघटने मार्फत दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी सुमारे ४० ते ४५ डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष जाऊन काम केले आहे.    पत्रकार विश्वास निकम यांना या अगोदर २०१५ साली दै. रायगडचा आवाजचा समाज भूषण पुरस्कार,२०२०-२१ चा आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच विविध क्षेत्रातील असंख्य सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले असून याची दखल रायगड जिल्हा परिषदेने घेत त्यांना मानाचा समाजाला जाणारा रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे.यावेळी रायगड भूषण पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे , नंदू कळमकर,भिवा पवार,कोलाड रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य,पत्रकार मित्र, रोहा तालुका व खांब ग्रुप कुणबी विभाग,ऐनघर बेरोजगार संघटना,मित्र परिवार, गोवे ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला मंडळ,यांनी या पुरस्कारा बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सदिच्छा देत अधिक विविध क्षेत्रातून त्यांचतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog