ओरिसात घेण्यात आलेल्या उंच उडी स्पर्धेत रायगडचा आर्यन पाटील ठरला सुवर्णपदकाचा मानकरी!   

 पुढील स्पर्धेसाठी फ्रान्सला  निवड!  

 आर्यन माणगाव वनवासी कल्याण आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांचे चिरंजीव! 

 आर्यन म्हणतो यशाचे श्रेय आदिवासी मित्रांना!

 ओरिसात प्रशिक्षकांसोबत आर्यन पाटील 

 माणगाव (प्रतिनिधी)रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी ओरिसा येथे स्कुल गेम फेड्रेशन ऑफ  इंडिया आयोजित इंटरनॅशनल ट्रायल्समध्ये कु.आर्यन अरूण पाटील हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला असुन उंच ऊडी खेळामध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याची निवड पूढील खेळासाठी फ्रांस येथे झाली आहे.

आर्यन पाटील याचे मुळ गाव रावे ता.पेण असुन सद्या तो पिल्लई काॅलेज रसायनी येथे १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे.ऊंच उडी खेळाचे प्रशिक्षक इंझमामुल अल हक्क व काॅलेजच्या प्रिंन्सिपल श्रीमती रिना निकालजे यांचे मार्गदर्शखाली आर्यनचे खेळाचे प्रशिक्षण सुरूआहे.आर्यनचे वडिल नोकरी निमित्त वनवासी कल्याण आश्रमाच्या माणगाव आश्रमशाळेत नोकरी करत असल्यामुळे आर्यन लहानपणापासूनच आदिवासी मुलांच्यात रहाणे, खेळणे आदि बाबी करत आला असल्याने आदिवासी मिञांपासुनच मला या खेळाचे पहीले धडे मिळालेत व माझ्यात काटकपणा येवून इथपर्यंत पोहोचलो असे सांगत आहे .आजतागायत अनेकवेळा राज्य व नॅशनल स्थरावरील खेळामध्ये अव्वल स्थान मिळवून आर्यनने उज्वल यश संपादन केले आहे.पुढे आॅलंपिक खेळून भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचे आर्यनचे स्वप्न आहे.आर्यनच्या या यशाचे कौतूक त्याच्या रावे गावापासून ते सार्‍या पंचक्रोशित होत असुन आर्यनला फ्रांस येथे होणार्‍या व भविष्यात होणार्‍या पुढील खेळासाठी अभिंनंदनाचा वर्षाव होत आहे.आर्यनला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog