आंबेवाडी नाका संजय गांधी नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

    गोवे-कोलाड (विश्वास निकम )अनेक वर्षापासुन चालत आलेल्या श्री. साती आसरा देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने तसेच सदगुरु स्वामी गणेश महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व सदगुरु स्वामी हरिचंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाने व श्री गणेश सत्संग मंडळाच्या सौजन्याने सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्यायाचे पारायण व यनिमित्ताने हरिपाठ, प्रवचन, किर्तन, भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.३१/३/२०२२ ते १/४/२०२२ पर्यंत आंबेवाडी नाका येथील संजय गांधी नगर येथे करण्यात येणार आहे.

       गुरुवार दि.३१ /३/२०२२ रोजी मंगळविधी कळस स्थापना, माऊली पूजन,गुरु पूजन, ध्वजारोहन, सकाळी १० ते १२ वा. ज्ञानेश्वरीच्या ९व्या व १२ अध्यायाचे पारायण, ५ ते ७ वा. कोलाड विभागयीय वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प. कैलास महाराज निचिते (आळंदी ) यांचा किर्तन व नंतर जागरण,शुक्रवार दि.१/४/२०२२ रोजी पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प. विजयानंद महाराज तेलंगे यांचे काल्याचे किर्तन, सायंकाळी ४ वा. दिंडी नगर प्रदक्षिणा, शनिवार दि.२/४/२०२२ श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात येणार असून सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी श्री.गणेश सत्संग ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरुण मंडळ,मेहनत घेत असून श्री गणेश सत्संग मंडळ खारपाळे पेण व ३७ शाखा तसेच कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

Comments

Popular posts from this blog