हेटवणे गावच्या खेळाडूंची बाजी

 नामदार चषकासह हेटवणे गावात एकाच दिवशी तीन ठिकाणाहून तीन बक्षिसे!

 रायगड जिल्ह्यातुन होतोय अभिनंदनाचा वर्षाव!  

      कोलाड -हेटवणे (संतोष निकम) रायगडच्या पालकमंत्री मा.आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनिल तटकरे युवा प्रतिष्टानच्या माध्यमातून व राकेश शिंदे यांच्या संकल्पनेतुन महिलांच्या जिल्हा स्तरीय  कबड्डी स्पर्धा शनिवार दि.१२ मार्च रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच रविवार दि.१३ मार्च रोजी ४ वाजता होममिनिस्टर व रात्री ९ वाजता नाईट क्रिकेटचे सामने आयोजित केले होते त्यासामन्यात बाजी मारून नामदार चषक प्रथम क्रमांक हेटवणे तालुका रोहा संघाने फटकावले तसेच त्याच दिवशी बोरघर येथे झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला तर भुवन येथे झालेल्या कबड्डी स्पर्द्येत तिसरा क्रमांक फटकावुन एक,दोन,तीन क्रमांक एकाच दिवशी बक्षिसांची खैरात केल्याने हेटवणे गावच्या ग्रामस्थ तसेच रायगड जिल्ह्यातून हेटवणे गावातील खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  


Comments

Popular posts from this blog