गोवे-कोलाड (विश्वास निकम )ह.भ.प.केतन महाराज गुप्ता यांनी बालवयातच धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाज प्रबोधन कार्य केले आहेत.यामुळे त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा रायगड भुषण पुरस्कार राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे,रजिप अध्यक्षा योगिता पारधी,बांधकाम सभापती निलिमाताई पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
ह.भ.प.केतन महाराज गुप्ता यांनी बालवयापासून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तनातून समाज प्रबोधन केले आहे. यामुळे त्यांना मनुष्य बळ विकास सेवा आकादमी तर्फे राज्यस्तरीय गुरुजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याची दख्खल घेत रायगड जिल्हा परिषदेनी त्यांना रायगड भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.या पुरस्काराबद्दल ह.भ.प.केतन महाराज गुप्ता यांचे शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय क्षेत्रतील असंख्य नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment