स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची सभा व वनभोजन कार्यक्रम उत्सहात संपन्न

गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाची सभा व वनभोजनाचा कार्यक्रम मंगळवार दि.८/३/२०२२ रोजी निसर्गरम्य असणाऱ्या कुंडलिका नदीच्या तिरावरील महादेव महाबळे यांच्या फार्म हाऊसवर मोठया उत्सहात आनंददायी वातावरणात संपन्न झाला.            

कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन करून व श्री गणेश व शिव छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोलाड परिसरातील तसेच जेष्ठ नागरिक संघटनेच्या परिवारातील देवाज्ञा झालेल्या व्यक्तींना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तद्नंतर सर्व पदाधिकारी यांनी भविष्यात जेष्ठ नागरिक यांच्यासाठी कोणकोणत्या योजना राबाविल्या जातील व त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे प्रयत्न करता येईल यांची सविस्तर माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले, अध्यक्ष मारुती राऊत, प्रवीणभाई गांधी कार्याध्यक्ष, धनाजी घोणे खजिनदार,नारायण धनवी,दहिंबेकर महाराज, दगडू शिगवण,दगडू बामुगडे,भरत सातांबेकर, विश्वनाथ धामणसे सह आदी सर्व सदस्य जेष्ठवनागरिक व माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.   

प्रसंगी यावेळी सद्सरच्या कार्यक्रमाला रायगड भूषण पत्रकार डॉ.श्यामभाऊ लोखंडे, यांनी सदरच्या कार्यक्रमाला सदिच्छा व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जेष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि सर्व जेष्ठ नागरिक यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे तुमचे कोणतेही प्रश्न असोत यासासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झालेले पत्रकार विश्वास निकम यांचा जेष्ठवनागरिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले, अध्यक्ष मारुती राऊत, प्रवीणभाई गांधी कार्याध्यक्ष, धनजी घोणे खजिनदार,नारायण धनवी,दहिंबेकर महाराज, दगडू शिगवण,दगडू बामुगडे,भरत सातांबेकर, विश्वनाथ धामणसे यांनी मार्गदर्शन केले.            

यावेळी जेष्ठ नागरिक यांनी विविध प्रकारची गिते सादर करून जेष्ठ नागरिक यांनी मनसोक्त आनंद घेतला तसेच नंदकुमार पवार, अशोक कदम, महादेव महाबळे, के.के महाबळे, बाळ कापसे, हरिचंद्र जाधव, अनंत पवार,बळीराम ठोंबरे,यशवंत ठाकूर,सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी मेहनत घेतली व शेवटी वनभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog