मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात
कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटनेर घुसले घरात
कुटूंब बालंबाल बचावले कोलाड जवळील खांब येथे घडली घटना
कोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्गावर नागोठणे कोलाड दरम्याम आपघाताची मालिका सुरूच असून रोहा तालुक्यातील खांब नजीक एका भरधाव मालवाहू कंटनर वरील चालकाचा ताबा सुटल्याने दुकान शेजारील घरात कंटनेर घुसल्याने घरातील कुटूंब बालंबाल बचावले घराचे खूप मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ अलिबाग येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर घडलेल्या घटनेबाबत सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी रात्री आठ च्या सुमारास गाडी नंबर N L 01 ab 0019 गोवा महामार्गावर माणगाव कोलाड कडून खांब नागोठणेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा अचानक ताबा सुटल्याने खांब नजीक रा ग पोटफोडे विद्यालय जवळील चेतन मेहता व प्रवीण भानत यांच्या घरात घुसल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली तर घरातील मेहता कुटूंब बालंबाल बचावले तर घडलेल्या भीषण दुर्घटनेत मेहता परिवाच्या घराचे व भानत यांचे खूप मोठे नुकसान झाले तर पार्किंग मध्ये उभी असलेल्या ऍक्टिवा तुव्हीलचा चक्काचूर झाला तर दुर्दैवी घडलेल्या आपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे .
सदर या अपघाताची खबर कोलाड पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी ए घायवत व त्यांच्या सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली व घटनेत जखमी अवस्थेत असलेले चालक यांना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून या घटनेची मोटर अपघात नोंद पोलीस डायरीत करत कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत असल्याची माहिती पो.घायवत यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment