पत्रकार हरिश्चंद्र महाडिक आणि विश्वास निकम यांना रायगड भूषण पुरस्कार जाहीर,

 ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र महाडिक

 ज्येष्ठ पत्रकार विश्वास निकम 

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील पत्रकार हरिश्चंद्र महाडिक व विश्वास निकम यांना रायगड जिल्हा परिषदेचा मनाचा दिला जाणारा रायगड भूषण पुरस्कार जाहीर झाला असून 6 मार्च रोजी जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या अलिबाग येथील कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे.

सुतारवाडी विभागातील ग्रामीण पत्रकार हरिश्चंद्र महाडिक व कोलाड विभागातील गोवे येथील पत्रकार विश्वास निकम यांना ग्रामीण भागातील पत्रकारितेच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ग्रामीण महाडिक सर हे ग्रामीण भागात गेली पंचिविस वर्ष निर्भीड पणे पत्रकार म्हणून जनतेच्या समस्यांवर व सामाजिक शैक्षणिक विषयावर लिखाण करून सामाज्यापुढे एक आदर्श निर्माण केले असल्याने त्यांना पत्रकारिते बरोबरच अनेक विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पुरस्कार देत गौरविण्यात आले त्याच बरोबर विविध सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे तसेच कोलाड येथील विश्वास निकम यांचे सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर पत्रकारिता करत विविध संस्थानी त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने अनेकदा सन्मानित केले आहे ग्रामीण भागातील समस्यांवर निर्भीडपणे लिखाण करत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे अशा रोहा तालुक्यातील सुतारवाडी व कोलाड येथील पत्रकार हरिश्चंद्र महाडिक व विश्वास निकम यांना रायगड भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog