तळा तालुक्यात रोवळे आदिवासीवाडीवर सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत दाखले वाटप
कोविड-१९ लसीकरणही यशस्वी
तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील रोवळे ग्रामपंचायत हद्दीतील रोवळे गाव हद्दीतील शिव व कोंडखोल आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांचे आदेशाने प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर आणि तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत सप्तसुत्री अभियानांतर्गत आदीवासी बांधवांना विविध दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी रोवळे सरपंच हरिश्चंद्र देवकर, नायब तहसीलदार स्मिता जाधव,मंडळ अधिकारी संजय ठाकर,सजा तलाठी अनिकेत पाटील उपस्थित होते.यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व तरुण आदी वासी बांधवांना गरुडझेप कार्यक्रमा बाबत तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांनी मार्गदर्शन केले.या वेळी सातबारा उतारा वाटप ३, उत्पन्न दाखले ४,आणि ५४ आदिवासी बांधवांचे उत्पन्न दाखल्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले.संजय गांधी निराधार योजनेचे ४ लाभार्थी फॉर्म भरून घेण्यात आले.त्याचे बरोबर आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड-१९ लसीकरणही यशस्वी रित्या करुन घेतले.या कार्यक्रमाला आदीवासी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment