शब्दांवर प्रभुत्व प्राप्त करून लहान वयातच  शिवचरित्रावर व्याख्यान देणाऱ्या व्याख्यानकार सिद्धी पवार हिचा भोई समाजाकडून सन्मान!

 कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील गोवे गावातील शिव कन्या सिद्धी सतीश पवार हिने रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन शिव चरित्र यांच्यवर आधारित व्याख्यान केले असून यांनी भोई समाजाचे नाव उंचावले आहे. सिद्धी पवार हिला बालपणा पासून व्याख्यान करण्याची आवड आहे. तिने शिव चरित्र्याचा अभ्यास करून व्याख्यान करण्यास प्रविण्य मिळवले आहे.यामुळे रायगड जिल्हा भोई समाज यांच्या तर्फे सिद्धी पवार हिच्या निवास्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.

          यावेळी रायगड जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष रामचंद्र शिर्के, माजी अध्यक्ष रत्नाकर कनोजे, माजी उपाध्यक्ष रविंद्र तारू,सेक्रेटरी अंकुश महाडिक,माजी उपसेक्रेटरी दिपक जाधव,उप खजिनदार अनिल सारंगे, माजी खजिनदार अरविंद महाडिक, सदस्य राजेश शिर्के, चंद्रकांत टिकोने, राम शिर्के,यांनी सिद्धी सतीश पवार हिचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog