रोहा सुतारवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र महाडिक रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित

        खांब(नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील जेष्ठ पत्रकार हरिश्चंद्र मारुती महाडिक यांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा रायगड भूषण पुरस्कार राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे, रजिप अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे,बांधकाम सभापती निलिमाताई पाटील आ.बाळाराम पाटील,माजी आ.पंडीतशेठ पाटील,मुख्याधिकारी डॉ किरण पाटील, यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

          हरिश्चंद्र महाडिक यांनी शैक्षणिक सेवेत अनेक वर्षे मोलाची कामगिरी केली , आध्यात्मिक चळवळ त्याच बरोबर राजकीय क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून गेली तीस वर्षे समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. याशिवाय त्यांनी शैक्षणिक सेवेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यात तेली समाजाची धुरा सांभाळली समाज्याच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्परतेने काम करत आहेत सुतारवाडी विभागात सामाजिक शैक्षणिक व सांस्क्रुतीक यावर ते अधिक कार्य करत आहेत त्याच बतोबर तंटामुक्ती समिती,ग्राम स्वछता अभियान, या कमेटीवर गेली अनेक वर्षे काम करत आहेत, त्याच बरोबर आदिवासी समाजाच्या जनहिताचे काम केले आहे. तर कोरोना काळात सुतारवाडी परिसरासह तालुक्यातील विविध संघटने मार्फत दिल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तर काही समाजातून मिळालेल्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी सुमारे 25 ते 30 डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष जाऊन काम केले आहे. 

    ज्येष्ठ  पत्रकार हरिश्चंद्र महाडिक यांना पत्रकार वृत्त संघटना विविध वृत्त पत्राचे तसेच विविध समाज सेवी संघटनेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याच बरोबर शैक्षणिक सेवेत कार्यरत असतांना त्यांना माध्यमिक सेवेतून आदर्श शिक्षक म्हणून रायगड जिल्हा परिषदेने या पूर्वी देखील सन्मानित केले विविध मंडळ तसेच दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडून आदिवासी मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच विविध क्षेत्रातील असंख्य सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले असून याची दखल रायगड जिल्हा परिषदेने घेत त्यांना मानाचा समजला जाणारा रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे.यावेळी रायगड भूषण पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे , नंदू कळमकर,भिवा पवार,कोलाड रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य,पत्रकार मित्र, रोहा तालुका व सुतारवाडी परिसरातील असंख्ये समाज बांधव विविध संघटना,मित्र परिवार, सुतारवाडी,येरळ,जमगाव आदी ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला मंडळ,यांनी या पुरस्कारा बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व सदिच्छा देत अधिक विविध क्षेत्रातून त्यांचतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog