रिक्षा चालकाची मुलगी बनली मर्चंट नेव्ही!
पुगांव गावची सुकन्या तन्वी लहाने हिची दक्षिण कोरिया येथे मर्चंट नेव्ही मध्ये नियुक्ती!
जिद्द,चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही :-कु.तन्वी मिलिंद लहाने
कोलाड: (विश्वास निकम)रोहा तालुक्याततील कोलाड परिसरातील पुगाव गावची सुकन्या तन्वी मिलिंद लहाने हिची मर्चंट नेव्ही मध्ये दक्षिण कोरियात नियुक्ती झाली आहे.यामुळे तन्वी लहाने हिने केलेली मेहनत व जिद्द यामुळे खेडेगावातील मुली कमी नाही हे सिद्ध केले आहे.
प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपली मुलगी शिक्षण घेऊन मोठी व्हावी हे स्वप्न असते. हे स्वप्न अंगी बाळगणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न पुगांव येथील तन्वी लहाने या मुलीने पूर्ण केले आहे. तन्वीचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कोलाड मधील महात्मा फुले संस्था येथे झाले. तर पुढील शिक्षण कोलाड हायस्कूल येथे पूर्ण झाले,तिच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने तन्वीने यशाचे शिखर गाठले असून तिने मिळवलेल्या यशाचे आज तिची तालुक्यातीने पहिली मुलगी म्हणून नेव्ही मध्ये दक्षिण कोरिया निवड झाली आहे. तन्वी हिच्या यशाबद्दल तीच्या पुगांव गावासह रोहा तालुक्यात तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. तिने घेतलेले भरारी खरंच कौतुकास्पद आहे. याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना तीने दिले आहे असे तीने सांगितले.
Comments
Post a Comment