कोलाड येथे नव्या कायद्यांच्या कार्यशाळा प्रशिक्षणाला सामाजिक संस्था,विद्यार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

 दैनिक पुढारी रायगड आयकॉन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते विश्वास निकम यांचा सत्कार! 

कोलाड- हेटवणे (संतोष निकम) कोलाड पोलीस ठाणे व ऍडो. समिर सानप यांच्या विशेष सहकार्यातून द.ग. तटकरे माध्यमिक हायस्कूल येथील सभागृहात कोलाड विभाग परिसरातील सामाजिक संस्था, विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी नवे लागू करण्यात आलेल्या नवीन कायद्यांचे अनुषंगाने कार्यशाळा प्रशिक्षण आयोजित करण्यात आली होती याला परिवारातील सामाजिक संस्था विद्यार्थी व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

कोलाड पोलिस स्टेशन आणि ऍड.समिर सानप  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा प्रशिक्षणास कोलाड पोलिस निरिक्षक नितीन मोहिते, ॲड. समिर सानप,पो.उपनिरीक्षक नितीन चौधरी, तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील,कोलाड हायस्कूलचे प्राचार्य तिरमिले, गोवे तंत्रनिकेतन कॉलेजचे प्रा.देशमुख, विनायक पोटफोडे,संजय कुर्ले,विजय सानप,सहदेव कापसे,चिल्हे हाय.मुख्याध्यापक दिपक जगताप,पो.पाटील गणेश महाडिक, पत्रकार शाम लोखंडे, विश्वास निकम,नंदकुमार मरवडे,जीवनधारा संस्था प्रतिनिधी गुलाब वाघमारे,दगडू बामुगडे,प्रविण गांधी,संजय तेलंगे,विजय शिंदे,आशिष कोठारी, सहदेव कापसे,अजय लोटणकर,संतोष निकम,सह मान्यवर व आदी कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी,पो.पाटील, सामाजिक स़स्थांचे प्रतिनिधी, एस व्ही आर एस टीम,विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक,बचतगट प्रतिनिधी, पत्रकार आदीं सुमारे २०० हून अधिक नागरिकांनी तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग नोंदवत लाभ घेतला. 

 यावेळी दैनिक पुढारी या वर्तमानपत्राने रायगड आयकॉन म्हूणन उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवलेले कोलाड गोवे येथील पत्रकार विश्वास निकम सत्कार करण्यात आला.

उत्स्पुर्त प्रतिसाद लाभलेल्या या नव्या आमलात आलेल्या कायद्याविषयी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळा प्रशिक्षणास ॲड. समिर सानप यांनी भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा २०२३, भारतीय साक्ष संहिता २०२३, ज्येष्ठ नागरीक आधार,या घटनेतील बदलते कायदे त्यांची अंमलबजावणी तसेच त्यातील तरतुदी यावर मौलिक मार्गदर्शन करत सरकारच्या विविध नवीन योजना शैक्षणिक, शेती,सामाजिक,पेन्शन त्याच बरोबर नव्या अधिक योजना यांचा अधिक लाभ घ्या असे सांगितले.तर पोलीस निरिक्षक नितीन मोहिते यांनी यांनी देखील मार्गदर्शन करताना सांगीतले की बदलते नवीन कायदे त्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.तसेच विविध प्रकारच्या सरकारचा योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहनही या प्रसंगी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलिस स्टेशनच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ या विषयी विशेष लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत पारितोषिक तसेच ऍड. समीर सानप,स्थानिक रेस्क्यू टीम सागर दहिंबेकर,पत्रकार विश्वास निकम,गुलाब वाघमारे यांनी सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामिरीबद्दल यांचे याप्रसंगी आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व आभार प्रदर्शनाने करण्यात आली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंमलदार नरेश पाटील आणि कोलाड पोलिस टीमने अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog