कोलाड इंदापूर दरम्यात रखडलेल्या कामांची युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांनी केली पाहणी, तळवली येथील ग्रामस्थाना दिलासा!


कोलाड( विश्वास निकम ) मुंबई गोवा महामार्गावरील कामाचा पेच दिवसेंदिवस ठेकेदारांकडून अडचणीचा ठरत असल्याने त्यांचा अंधाधूनी कारभार आणि ठेकेदाराची मनमानी दिवसेंदिवस मार्गालगत असलेल्या ग्रामस्थ नागरीकांना डोकेदुखी ठरत असल्याने अशा या ठेकेदाराच्या गलथान कारभारावर तळवली तर्फे दिवाली येथील ग्रामस्थ नागरिकांची गेली बारा वर्षे काम रखडल्याने मोठी हेळसांड होत असल्याने ते कमालीचे आक्रमक होत.त्यामुळे ठेकेदार विरोधात मोठा एल्गार करत येथील पादचारी उड्डाण पूल आणि सर्व्हिस रोड त्याच बरोबर त्याला जोडला गेलेला गावाकडे जाणारा मार्ग याचे काम अर्धवट त्यामुळे अनेकदा शासन दरबारी तसेच आमदार खासदार यांच्याकडे ग्रामस्थानी पाठपुरावा केला त्याची दखल घेत शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी युवा नेते तथा माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पाहणी केली.तर पाहणी दरम्यान येथील कामासंदर्भात पादचारी उड्डाण पूल तसेच गावाला जोडला गेलेला रस्ता सर्व्हिस रोड त्याला जोडली गेलेली गटार लाईनच्या कामात कोणतेही हायगय करू नका काम करत असताना ग्रामस्थांच्या घरांना धोका होणार नाही याची दखल घेऊन तसेच त्यांना विचारात घेऊन येथील कामे करा असा इशारा उपस्थित ग्रामस्थांसमवेत युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांनी कल्याण टोल कंपनीचे उपस्थित अधिकारी आणि ठेकेदार यांना दिला.

येथील ग्रामस्थांच्या अनेक समस्या मार्गावर ग्रामस्थांसाठी गेली अनेक वर्ष बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे तसेच ठिक ठिकाणी खोदून ठेवलेली माती बरावर्षाहून अधिक काळ ग्रामस्थांना त्या धुळीला सामोरे जावे लागत आहे. आधीच्या ठेकेदारांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे अथवा काम करण्यासाठी वापरात आलेल्या ब्रेकर मशीन साधनांमुळे काही घराना तडे गेले कौले फुटली या बाबत अनेकदा शासन दरबारी हेलपाटे मारावे लागले अद्याप त्याकडे कोणी जबाब दिला नाही कवडी मोलाच्या किंमतीत जागा जमिनी गेला त्याचा मोबदला देखील पुरेसा नाही असे गाऱ्हाणे पाहणी दरम्यान नेते अनिकेतभाई तटकरे यांच्या समोर मांडले तर गावाला पादचारी पुलाखालून जोडण्यात येत असलेला मार्ग हा अपघाताला धोका होणार असल्याची व्यथा सांगत बहुतांश अडचणी ग्रामस्थानी मांडल्या तर त्याचे निवारण करत या गोष्टींचा गांभीर्य घेत सर्व ग्रामस्थानी एका विचाराला येऊन यावर चर्चा करून जसे योग्य वाटेल तसे काम करावे कामे रखडवू नये कोलाड इंदापूर दरम्यानच्या कामात गती येईल तसेच काम करत असताना ग्रामस्थांच्या घरांना धोका निर्माण होणार नाही याची अधिक दक्षता सदरच्या ठेकेदारांनी घ्यावी असा इशारा यावेळी युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांनी दिला. 

यावेळी युवा कार्यकर्ते राकेश शिंदे, संजय राजिवले कल्याण टोल कंपनीचे अधिकारी धर्मेंद्र पाटीदार, तसेच ठेकेदार,तळवली तर्फे दिवाली ग्राम पंचायतीचे (उपसरपंच )जयेश घावटे, दिगंबर घावटे, कुलदिप सुतार , प्रफुल घावटे, अशोक घावटे, संजय तेलंगे अशोक घावटे  , प्रकाश चौधरी , सुभाष घावटे , महेंद्र पानसर , राजेंद्र पानसर, विलास तेलंगे , संतोष घावटे,सौरभ वडे,आदी ग्रामस्थ तथा महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रीया :-आम्हा ग्रामस्थांच्या मागणीला तसेच अर्धवट कामांची युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांनी पाहणी केली नक्कीच आम्हा ग्रामस्थाना दिलासा मिळेल. यात शंका नाही.तसेच महामार्गाचे काम करण्यास आम्हा ग्रामस्थांचा कोणताही ठेकेदाराला अडथला नाही.बांधण्यात आलेला पादचारी उड्डाण पूल, त्याला जोडण्यात आलेला रस्ता, सर्व्हिस रोड, गटारे, या कामात असंख्ये त्रुटी त्यावर संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने काम करत असून कोणत्याही प्रकारे ग्रामस्थाना विश्वासात न घेता काम करत आहे मागिल ठेकेदार यांनी काम करत असताना त्यांनी ज्या मशिनरी वापरल्या त्यामुळे ग्रामस्थ प्रफुल घावटे यांच्या घराला असंख्ये तडे गेले त्याची त्यांनी अनेकदा नुकसानपरपाई मिळावी पाठपुरावा केला पेण प्रांत अधिकारी यांनी जनरल मॅमेजर टेक्निकल पी डी एन एच आय पी आय यू यांना देखील पत्र काढले मात्र त्याची दखल आजतागायत कोणी घेत नाही.त्यामुळे येथे पुन्हा काम करण्यासाठी येथील ग्रामस्थांच्या समस्येचे निवारण करून कामे करण्यात यावी.....जयेश घावटे उपसरपंच

Comments

Popular posts from this blog