रायगड जिल्हा क्रीडा व व्यक्तिमत्व विकास जिल्हास्तरीय स्पर्धेत रा जि प शाळा पुगांव शाळेची नेत्रदीपक कामगिरी!
कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्हा क्रीडा व व्यक्तिमत्व विकास जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार विजेती शाळा वडगाव ता खालापूर येथे पार पडली. या स्पर्धेत लहान गट समूहगीत गायन या गटात रायगड जिल्हा परिषद शाळा पुगांव ने रोहा तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना द्वितीय क्रमांक पटकावला. पुगांव शाळेच्या या दैदिप्यमान कामगिरीत शाळेचे विध्यार्थी आराध्य देशमुख, श्रीयोग सुतार,रुही देशमुख, आरोही देशमुख, विभा बर्जे, समर्थ धूपकर, शौर्य मासक,अनन्या देशमुख,शुभ्रा देशमुख, साई बामणे,ओमकार देशमुख या विदयार्थ्यांनी गायन, वादन व आकर्षक वेशभूषा या तिन्ही उत्कृष्ट सदरीकरण करून स्पर्धेचे उपविजेते पद पटकावले. या सर्वाना उत्कृष्ट मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री निवास थळे व उपशिक्षक श्री प्रसाद साळवी यांनी केले. या स्पर्धेसाठी शाळेस माजी विदयार्थी श्री राजेंद्र धनवी यांनी नेपथ्य साहित्य, श्री अजित देशमुख यांनी हार्मोनियम, श्री संदेश बामणे यांनी तबला, माजी विध्यार्थी श्री हरेश धूपकर आणि मित्रमंडळ यांनी ढोलकी व इतर साहित्य उपलब्ध करुन दिले.
या नेत्रदीपक यशाबद्दल शिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव मॅडम, गटशिक्षणाधिकारी सौ मेघना धायगुडे मॅडम , केंद्रप्रमुखा सौ. रश्मी साळी मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती पुगांव, ग्रामस्थ पुगांव, सर्व शिक्षक वृंद पुगांव केंद्र यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment