बाहे गावातील कलिंगडे निघाली परदेशाला,जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडचे उत्तम पिक!


कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात  भाजीपाला व्यवसाय करीत आहेत. एवढेच नाही तर १९८९ च्या पुरामुळे गावाचे पुनर्वसन झाले यामुळे आपल्या शेतीपासून येथील गावकऱ्यांना दूर रहावे लागले परंतु तरीही येथील शेतकऱ्यांनी कधीही हार मानली नाही. उन्हाळी शेतावर झोपडी बांधून भाजीपाला व्यवसाय सुरु ठेवला आहे.

 परंतु बाहे येथील शेतकरी जगदीश थिटे यांनी भाजीपाला पिक सोडून यावर्षी कलिंगड यांचे पिक घेण्याचे ठरविले.सर्व मेहनत करुन कलिंगड याचे पिक उत्तम प्रकारे आले आहे तसेच कलिंगडचे फळ ही मोठे झाले आहे शिवाय कलर लालसर व त्याची चव अतिशय गोड असल्यामुळे या कलिंगडला परदेशातून मागणी आल्यामुळे ही कलिंगड परदेशात रवाना झाली आहेत.यामुळे शेतकरी जगदीश थिटे यांनी केलेली मेहनत कामी आली असुन त्यांना या कलिंगड पिकापासून फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog