कोलाड हायस्कूल कोलाड मधील माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा उत्साही वातावरणात संपन्न!
सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचा केला सत्कार!
कोलाड (विश्वास निकाम) कोलाड हायस्कूल कोलाड मधील १९८० ते २००५ पर्यंत शिक्षक घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक कोलाड येथील सभागृहात मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रोहा तहसीलदार किशोर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी संजय धुमाळ, कोलाड सपोनि नितीन मोहिते, संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र लिमये, रविकांत घोसाळकर, माजी सरपंच सुरेश दादा महाबळे, यांच्यासह असंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.
मेळावा संस्कारांचा, मेळावा गुरुजनांच्या ऋणमुक्ततेचा, मेळावा गुरुजनांच्या आदर सत्कारांच्या या ओवी प्रमाणे सर्व गुरुजन व कर्मचारी वृंद यांना स्टेज पर्यंत पुष्प वर्षाव करीत आणण्यात आले.यानंतर वाघ सर,ओंकार पाटील सर,अष्टेकर मॅडम,महाबळे मॅडम, एच. डी. पाटील सर, सय्यद सर, विद्वांस मॅडम, थोरबोले सर, गाडेकर सर, वरखले मॅडम, म्हामुणकर मॅडम,चिस्ती सर, एस. सी.देशमुख मॅडम, एस आर.पाटील सर, सायरा शेख मॅडम, के. एस वाघमारे,जि.ए.पवार सर,जे एस माळी सर, नांदिवडेकर मॅडम, शिरीष येरुणकर सर,एस आर तिरमले, पारखी मॅडम, बी. बी. काळे,पांगळे मॅडम, तसेच कर्मचारी वृंद घोसाळकर, हरिभाऊ बिरगावले, एकनाथ सुतार, काशिनाथ शिर्के,सीताराम सुतार, शांताराम पाटील, सुधीर कोरेगावकर, सुरेश साटम, एस टी शिंदे, पलंगे काकी, काटम काकी खांडेकर काकी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षकांनी केलेले संस्कार यामुळे आपण कसे घडू शकलो.तसेच शिक्षक वर्गात आले की विद्यार्थ्यांची उडणारी धांदळ,त्या काळात मोबाईल नसल्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्षात भेटून असणारे प्रश्न सोडवावे लागत होते.त्यासाठी शिक्षक ही विद्यार्थ्यांना वेळ देत होते.यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांची घट्ट मैत्री दिसून येत होती.यामुळे आम्ही घडलो असल्याचे असंख्य माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त करतांना विविध आठवणी जाग्या केल्या तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आपल्याला घडविणारे शिक्षक तसेच सर्व माजी विद्यार्थी २५ वर्षांनी एकत्र आल्याने सर्व वातावरण आनंदी झाले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरीष येरुणकर सर,नरेश बिरगावले,संजय कुर्ले,निशिकांत पाटील, प्रफुल्ल बेटकर,निवृत्ती आंबेतकर,तसेच १९८० ते २००५ मधील असंख्य माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी अपार मेहनत घेतली.
Comments
Post a Comment