लायन्स क्लब कोलाड रोहा आयोजित आंबेवाडी येथील  मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

६४ जणांची तपासणी १२ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया!

   कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील हनुमान मंदिरात लायन्स क्लब कोलाड लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग तसेच जय हनुमान मित्र मंडळ  यांच्या वतीने बुधवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला येथील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत सदरच्या शिबिरात ६४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १२ जणांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया होणार आहे.

     लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ यांच्या कृपाछत्राखाली तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे अविरतपणे कोलाड विभाग परिसरात कोलाड लायन्स क्लब ही सेवा भावी संस्था सामजिक शैक्षणीक कला क्रिडा सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करत ग्रामीण भागातील तळागाळातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत आहे. आंबेवाडी येथील हनुमान मंदिरात  सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याला भरभरुन प्रतिसाद मिळाला तर ६४ रुग्णांची तपासणी करून  रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ मंगेश सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार राजेंदर कोप्पू,उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी,डॉ श्याम लोखंडे,माजी अध्यक्ष नरेश बिरगावाले, गजानन बामणे, नंदकुमार कळमकर,दिनकर सानप,विश्वास निकम, विठ्ठल सावळे, दिलीप मोहिते,तसेच,चेतना ताई लोखंडे माजी सरपंच व मा रोहा पंचायत समिती सदस्या, विष्णु लोखंडे मा.तालुका प्रमुख, जेष्ठनागरिक मारुतीबुवा  लोखंडे,  यांच्यासह असंख्य ग्रामस्थ,लायन्स क्लबचे सर्व लायन मेंबर्स तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग तपासणी टीम उपस्थित होती.

    सर्व शिबीर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत लोखंडे, रामदास लोखंडे, विनायक लोखंडे, दिनेश लोखंडे, दिपक लोखंडे, मनोहर लोखंडे, सुधीर सानप, तसेच लायन्स क्लब कोलाड रोहा पदाधिकारी व सर्व सदस्य  लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागचे प्रतिक कणसे, सुजित पाटील,श्रावणी मसुरकर तसेच ऐश्वर्या मोहिते, मुकेश शेलार, गांधी डॉक्टर यांची टीम अश्विनी जांभळे, मोनिका लोखंडे यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog