ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब येथे शिवजयंती उत्सव उत्सहात साजरा,या निमित्ताने टी.डब्लू.जे. फाउंडेशन वतीने वक्तृत्व स्पर्धा!
कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम येथे रयतेचा राजा,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मउत्सव सोहळा मोठया उत्सहात साजरा करण्यात आला या निमित्ताने टी.डब्लू.जे. फाऊंडेशन खारघर यांच्याकडून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णुभाई लोखंडे,लायन्स क्लब कोलाडचे अध्यक्ष डॉ.मंगेश सानप, टी. डब्लू. जे.फाउंडेशनच्या मॅनेजर ऐश्वर्या मोहिते, संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्यध्यापिका रिया लोखंडे, उपमुख्याध्यापिका सुप्रिया पाशिलकर,शिक्षिका ऋतुजा पवार, प्रतिक्षा धामणसे,रुपाली मरवडे,निलम दळवी, प्रियांका चिकणे, प्रज्ञा माने, दर्शना धनवी, मदतनीस श्रुती वाजे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करुन लेझीम,बाणा बनाटी तसेच इतर शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिके करण्यात आली.यानंतर शिवजयंती निमित्ताने टी. डब्लू.जे. फाऊंडेशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील इयत्ता ७ वी ते ९ वी पर्यंत कनिका कचरे प्रथम, चैतन्य चितळकर द्वितीय, स्वयंम शिर्के तृतीय, इयत्ता ४ थी ते ६ वी पर्यंत आर्या जाधव प्रथम,स्मरण जाधव द्वितीय, स्वरा धामणसे तृतीय, तसेच १ ली ते ३ री पर्यंत अध्या भालेकर प्रथम,पलक कचरे द्वितीय, आरोही मरवडे तृतीय क्रमांकाचे मानकरी विद्यार्थी ठरले सर्व
विजेत्या विद्यार्थ्यांना टी. डब्लू जे फाउंडेशनच्या मॅनेजर ऐश्वर्या मोहिते यांच्या कडून विजेत्या विद्यार्थ्यांना पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल शेडगे व श्रुती वाटवे यांनी केले.
Comments
Post a Comment