पुई गावची समिक्षा लहाने मुंबई पोलीस व कारागृह पोलीस दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण 

विविध स्तरावरून अभिनंदन!

  कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यात कोलाड परिसरातील पुई गावची सुकन्या समिक्षा सूर्यकांत लहाने हिने प्रतिकुल परिस्थिती वर मात करीत प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुंबई पोलीस व कारागृह पोलीस या दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण झाली या यशाबद्दल तीचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

                 समिक्षा लहाने हिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी मृत्यू झाले आहे.त्यामुळे तीच्या वडिलांचे छात्र हरवले आहे. परंतु ती न डगमगता तिने मुंबई पोलीस व कारागृह पोलीस दोन दिल्या व कठोर मेहनत व जिद्दीने ती उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल तीचे कोलाड लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सागर सानप,अध्यक्ष डॉ.मंगेश सानप, उपाध्यक्ष डॉ.विनोद गांधी,उपाध्यक्ष डॉ. श्यामभाऊ लोखंडे,सचिव रविंद्र लोखंडे,खजिनदार राजेंद्र कप्पू,गजानन बामणे,नरेश बिरगावले,अलंकार खांडेकर,नंदकुमार कळमकर, विश्वास निकम,विठ्ठल सावळे,दिनकर सानप,दिलीप मोहिते तसेच कोलाड लायन्स क्लबचे पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे,संजय कुर्ले, शिरीष येरुणकर सर,गणेश शिंदे, महेंद्र वाचकावडे, बाळू पाटील,विनायक रुगे,चंद्रकांत लहाने, अजित लहाने,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समीक्षा लहाने हिच्या निवास्थानी जाऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

  प्रतिक्रिया :-आपल्या खेडेगावातील तरुणांना उच्च शिक्षण घेण्याची आवड असते परंतु आर्थिक परिस्थिती व इतर कारणामुळे शक्य होत नाही परंतु यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम पर्याय आहे हे समिक्षा लहाने हिने दाखवून दिले आहे विशेष म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण कोकणातुन फक्त  दोन मुलीने परीक्षा दिली व यामध्ये समीक्षा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.या पुढील शिक्षणासाठी कोणतेही मद्दत लागली तर आम्हाला सांग आमचे सहकार्य नेहमीच राहील तसेच तू आय.पी.एस व्हावी असे मत लायन्स क्लब कोलाडचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सागर सानप व डॉ. मंगेश सानप यांनी समिक्षा लहाने हिचे अभिनंदन करतांना व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog