गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निशा जवके यांची बिनविरोध निवड 

कोलाड (विश्वास निकम) रोहा तालुक्यातील गोवे  ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी गोवे गावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ.निशा नितीन जवके यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात पार पडत सौ निशा जवके यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

   खासदार सुनिल तटकरे,कॅबिनेट मंत्री आदितीताई  तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे,यांच्या माध्यमातून तसेच सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या प्रयत्नाने या ग्रामपंचायती मधील असंख्य विकास कामे मार्गी लागली आहेत यामुळे या  ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचे गेली पंधरा वर्षांपासुन बिनविरोध वर्चस्व आहे,त्यामुळे ठरलेल्या ठराविक कालावधीनंतर राष्ट्रवादीचे उपसरपंच सुमित गायकवाड  यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या ग्रामपंचायतीवर सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी ठरवल्या प्रमाणे सौ. निशा जवके यांना संधी देत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

   यावेळी विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, विद्यमान सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे उपसरपंच सुमित गायकवाड, सदस्य सुप्रिया जाधव, नितीन जाधव, नरेंद्र पवार, रंजिता जाधव, अंजली पिंपलकर, भावना कापसे, ग्रामविकास अधिकारी गोविंद शिद,कर्मचारी मयुरी जाधव, अश्विनी पोटफोडे, अजय पिंपलकर,रामभाऊ जाधव,सुजाता जाधव नारायण जवके,महेंद्र जाधव,नितीन जवके,नयन जाधव,वैभवी जाधव, विजय जाधव, खेतन पवार,नाजुका जाधव, भक्ती कापसे, भिमराज कापसे,रजत जाधव, प्रीती जाधव, सुवर्णा जाधव, राकेश जाधव,अर्पिता जाधव, रसिका सुर्वे,आलका जाधव,शितेश्री कापसे,तसेच गोवे ग्रामस्थ व असंख्य महिला वर्ग यांनी यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ निशा जवके यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog