Posts

Image
  कोलाड-रोहा रस्त्यावर ट्रॅक्टरचा चाक साईड पट्टीत रूतला!   निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुनाच समोर आला! सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक) मे महिन्यात कोलाड-रोहा या रस्त्याच्या साईट पट्या भरण्याचे  काम वेगाने सुरु होते.  रस्त्याच्या दोन्हीही बाजुंनी साईड पट्टा  भरल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते,  मात्र या साईड पट्ट्या भरताना माल वापरला की नाही याची शाश्वती आली असून , वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की, पहूर ( ता. रोहा ) येथील श्री प्रेम चव्हाण यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. 06 सी.डी. 4095 हा रोहा कडे जात असताना , संभे बस थांब्या पासून अर्धा कि.मी.अंतरावर  गेल्या नंतर ट्रॅक्टरचा चाक साईड पडीत रूतला जवळ-जवळ  निम्या पेक्षा जास्तच चाक साईड पट्टीत रूतला गेला होता.  ट्रॅक्टरच्या  ऐवजी ट्रक क्रेन एस. टी.असती तर पलटी झाली असती असे अनेकांनी बोलून दाखवले.  साईड पट्टी मध्ये रूतलेल्या  ट्रॅक्टरच्या चाकाला वर काढण्या करिना क्रेन बोलवून अर्थिक तोटा सहन करून चाक वर काढण्यात आले. ज्या...
Image
  सुतारवाडी हायस्कूलचे विद्यार्थी १२ वर्षांनी एकत्र सुतारवाडी :- ( हरिश्चंद्र महाडिक ) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय सुतारवाडीच्या सन २००९-२०१० च्या बॅचचे विद्यार्थी १२ वर्षानंतर एकत्र जमले आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाला दिला. मोबाईल व्हाट्सअप द्वारे ग्रुप करून नियोजन केल्यानंतर सर्वांनी एकत्र येण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रथम सर्वजण द. ग. तटकरे विद्यालयाच्या इमारती समोर एकत्र आले. (त्या वेळी इमारत बांधलेली नव्हती) आपल्या शाळेची भव्य इमारत सभोवताली संरक्षक कठडे आणि ज्या मैदानात अनेक खेळ खेळून इयत्ता पाचवीतुन दहावीत गेलो त्या मैदानाकडे पाहुन सर्वांना जुन्या आठवणी आणि आपले शिक्षक आठविले.                 जुन्या इमारतीसमोर फोटो काढल्यानंतर धगडवाडी येथील निसर्गरम्य असलेल्या फार्ममध्ये जाऊन प्रथम सर्वांच्या उपस्थितीत केक कापला आणि विविध खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देत. आणि गेट टुगेदर चा आनंद द्विगुणीत केला. मिथुन रेवाळे, स्वप्निल घाडगे, अक्षय कोरपे, प्रसाद गायकवाड, जागृती चंदने, श्वेता शिंदे, प्रिया पवार, मिना...
Image
  रोह्यात शिवसैनिकांत चलबीचल, तर राष्ट्रवादीचा गोटात सन्नाटा, मंत्री पदाचे काय? चर्चेला उधाण... कोलाड नाका  (शरद जाधव) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची चिन्हे असुन याकडे पुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होणार का?आणखी काय,  याची धाकधुक सर्वाना लागली आहे. रोहा तालुक्यात मात्र शिवसैनिकात कोणता झेंडा घेऊ हाती अशी चलबीचल परिस्थिती असुन या बंडाने सत्ता गेली तर  अदिती तटकरे यांच्या  मंत्री पदाचे काय, याची चर्चा असुन या बंडाच्या घडामोडीत राष्ट्रवादीच्या गोटात सुधा  संनाटा पसरला असल्याचे दिसून येत आहे.             अडीच वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडात शिवसेनेला चांगले यश मिळुन त्याचे 3 आमदार निवडून आले. या निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या शेकाप ला पराभवाला सामोरे जावे लगले. लोकसभेत जनतेने शिवसेनेला नाकारले असले तरी मात्र विधानसभेत शिवसेनेला चांगला कौल दिला.    शिवसेना व भाजप युती होणार सेनेला मंत्री पद मिळनार असे चित्र एकंदरीत असताना अचानक राष्ट्रवादी व सेना युती...
Image
  गोवे रस्त्याला चिखल व खड्डयांचे साम्राज्य, विद्यार्थ्यांनासह,जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांच्या जिवाला धोका!   कोलाड (विश्वास निकम ) मुंबई-गोवा हायवे वरून गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून या रस्त्याला पहिल्याच पावसात चिखल व खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.                    या मार्गावर गोवे येथे श्रीमती गिता द. तटकरे पॉलिटेक्निक कॉलेज,आय.टी.आय, बी. एस. सी, बी. कॉम, बी. ए कॉलेज असल्यामुळे येथे असंख्य विद्यार्थी ये-जा करीत असतात. तर गोवे येथील असंख्य विद्यार्थी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड येथे ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षक घेण्यासाठी येजा करीत असतात तसेच कोलाड येथे बाजारपेठेच्या ठिकाणी जाणारे असंख्य नागरिक व धाटाव औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी येजा करणारे असंख्य कामगार वर्ग याच मार्गावरून येजा करीत असतात.यामुळे या चिखलातून व खड्डयातून प्रवास करतांना टुव्हीलर गाड्या स्लिप होत आहेत.   ...
Image
  तळगडावरून कोसळलेल्या दगडांमुळे दोन घरांचे नुकसान,     एक महीला जखमी   तहसीलदारांनी घटनास्थळी  घेतली तातडीची भेट! ( तळा कृष्णा भोसले) तळा शहरातील जोगवाडी येथे तळगड किल्ल्यावरून कोसळलेल्या दोन मोठ्या दगडांमुळे दोन घरांचे मोठे नुकसान होऊन एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तळा शहरातील तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जोगवाडी गावात सकाळी साडे आठ च्या दरम्यान तळगड किल्ल्यावरून दोन मोठे दगड जोरदार वेगाने खाली कोसळले व यातील एक दगड गणपत रामभाऊ शिंदे यांच्या तर दुसरा दगड सुमित्रा शशिकांत शिंदे यांच्या घरावर येऊन आदळल्याने या दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या गावातील नागरिकांनी धाव घेतभराव बाजूला करण्यास सुरुवात केली असता यावेळी घराजवळ असलेल्या बंदिनी मंगेश शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्या जखमी अवस्थेत पडल्या असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.ग्रामस्थांनी तातडीने जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी दवाखान्यात हलविले.  घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ए.एम.कनशेट्टी,उपनगराध्यक्ष चं...
Image
  सावरवाडी येथील कुमार सिद्धेश शिर्के याचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान! सुतारवाडी :- (हरिश्चंद्र महाडिक) महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या वतीने जागतिक ऑलिम्पिक दिना निमित्त रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी कु.सिद्धेश दिपक शिर्के या दिव्यांग खेळाडूला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.अशोकजी दुधे साहेब यांच्या शुभहस्ते विशेष असे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले या प्रसंगी पोलिस मुख्यालयाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुलजी झेंडे साहेब, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रवींद्र नाईक साहेब  व श्री.सचीन निकम साहेब, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती अंकिता मयेकर मॅडम, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्र...
Image
  रोहा वनविभागाची धडक कामगिरी अवैद्यरित्या लाकडी कोळसा वाहतूक करणारा पिकअप टेम्पो केला जप्त, कोलाड (श्याम लोखंडे ) अवैध वृक्षतोड करून तयार केलेल्या लाकडी कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती रोहा वनविभागाला मिळताच विभागाने तातडीने घटना स्थळावर जाऊन लाखो रुपये किंमतीचा लाकडी कोळशासह पिकअप टेम्पो गाडी जप्त करून या बाबतचा गुन्हा नोंदविला आहे.         याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रोहा मनोज वाघमारे व स्टाफ प्रमोद पवार वनपाल मेढा,निलेश वाघमारे वनपाल गोफण, तेजस नरे वनरक्षक शेणवई,ज्योती मिरगणे वनरक्षक निडी,योगेश देशमुख वनरक्षक मेढा, जयवंत वाघमारे वनरक्षक यशवंतखार,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,पोपट करांडे, वनरक्षक रोहा विकास राजपूत,वनरक्षक ताम्हणशेत वैभव बत्तीसे,लेखापाल प्रदीप इनामदार यांनी दिनांक 25 जून 2022 रोजी रात्री 09.00 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरून रोहा तालुक्यातील मौजे अष्टमी येथील एच पी पेट्रोल पंपासमोर बोलेरो पीकअप क्...