Posts

Showing posts from August, 2026
Image
  गोरेगाव दोशी वकील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा            प्रतियोगिता परीक्षांच्या 500 ग्रंथ                   मासिकांचे प्रदर्शन    गोरेगाव (सृष्टी पवार) माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी सी यु बी सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गोरेगाव - रायगड येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आणि करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते.  यामध्ये विविध प्रकाशनाची सुमारे 500 स्पर्धा परीक्षा पुस्तके मासिके, चालू घडामोडी इ. पुस्तके ठेवण्यात आली होती.  प्राचार्य डॉ. जनार्दन होटकर सर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. करियर कट्टा समन्वयक डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती करून दिली. ग्रंथपाल डॉक्टर गणेश सानप यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक...
Image
  गोरेगाव -रायगड येथील दोशी वकील महाविद्यालयात करियर कट्टा मार्गदर्शन आणि इंडक्शन कार्यशाळा संपन्न   गोरेगाव:(सृष्टी पवार) माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी. सी. यु. बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, गोरेगाव, तालुका - माणगाव, जि.रायगड, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये करियर कट्टा इंडक्शन-जागृती कार्यशाळा शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडली.  याप्रसंगी करिअर कट्टा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होटकर सर यांनी मार्गदर्शन केले. करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी करिअर कट्टा आपल्याला स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार कसा बनवू शकतो, याविषयी विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती दिली. करियर कट्टा विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध सोयी-  सुविधा आणि उपक्रमांविषयी चे व्हिडिओज मुलांना दाखवण्यात आले. करियर कट्टा च्या ॲप मध्ये...