रोहा डोळवहाल येथे आधार ग्राम संघाची स्थापना

मिळणार विविध योजनेचा लाभ

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील ऐनवहाल ग्राम पंचायत हद्दीतील डोळवहाल येथे ' उमेद 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान ग्राम संघाच्या वतीने 20 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत येथील बचत गटातील महिलांना उमेद अंतर्गत आधार ग्राम संघाला वर्धा येथून आलेल्या वर्धिनीन कडून प्रशिक्षण देत या ठिकाणी आधार ग्राम संघाची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे आता येथील बचत गटांना विविध योजनेचा लाभ घेता येईल .

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती संघ अभियान अंतर्गत तालुक्यातील ऐनवहाल ग्राम पंचायतील मौजे डोळवहाल येथे आधार ग्राम संघाची स्थापन करण्यात आल्या तसेच त्यांच्या समित्या यावेळी नेमण्यात आल्या.20 ते 23 फेब्रुवारी 2022 रोजी वर्धा येथून आलेल्या ग्राम संघाच्या वरिष्ठ वर्धिनी जयश्रीताई ठोबंरे सविताताई नेहारे,संध्याताई विरखडे,यांनी येथील उपस्थित व प्रशिक्षणार्थी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले. यावेळी आधार ग्राम संघाची स्थापना त्या अंतर्गत त्यांच्या दहा बचत गटांच्या समित्या यावेळी तयार करून सदरच्या महिलांना ग्राम संघाबाबत व त्याच्या कार्याची माहिती या प्रशिक्षणातून दिली.

या प्रसंगी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आधार ग्राम संघाच्या अध्यक्षपदी निर्मलाताई वाघमारे,सचिव गणिताताई भगत,कोषाध्यक्ष सुचिताताई गोळे,लिपिका पल्लवीताई बामणे,यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली तसेच त्यांचे उपसंघ व त्यांच्या पदाधिकारी यांच्या देखील नियुक्ती करण्यात आल्या .

सन 2011 पासून शासनाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातून आधार ग्राम संघाची सुरुवात करण्यात आली असून त्याचा माहिती प्रसार आणि विविध योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मिळावा यासाठी येथील वर्धियनी या संघामार्फत महिला बचत गटांना एकत्रित करून प्रशिक्षण देत देत आहेत. आधार महिला ग्राम संघाची स्थापना करणे ,त्यांना ग्राम पंचायत हद्दीत दहा बचत गट व अधिक त्यांच्या उपसमित्या तयार करणे, उमेद आधार ग्राम संघातून मूलभूत प्रशिक्षण देणे, बचत गटांना माहिती, महिला एकत्रित करण करत महिला सक्षमीकरण त्याच बरोबर आधार ग्राम संघाचे प्रशिक्षण शिबीर व महिलांना मार्गदर्शन अभियान आधार ग्राम सभा जोडणी अभियान,गट बँक जोडणी, उप समिती सूक्ष्मनियोजन आढावा, महिलांच्या समस्या,शासकीय यंत्रणे बरोबर जुळून राहणे,शासकीय योजनेची माहिती घेणे महिन्यातून एक सभा घेणे,सभेचे नियोजन ,सभा व सभेपुढील विषय समजून घेणे,

यावेळी ग्राम पंचायतीचे सरपंच विश्वनाथ धामणसे, माजी सरपंच रामदास खामकर,पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते सुनील शेडगे,आदी मान्यवरांच्या शुभहस्ते आधार ग्राम संघावर नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला असून प्रशिक्षक वर्धियनी यांचे देखील स्वागत सरपंच यांचे हस्ते पुष्पगुच्छ व भेट वस्तू देत करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog