कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत आदिवासी बांधवांना दाखले वाटप
तळा (कृष्णा भोसले) देशाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व तळा तहसिल यांचे संयुक्त विद्यमाने मेढा आदीवासीवाडी येथे कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत आदीवासी बांधवांना दाखले वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला तळा नायब तहसीलदार स्मिता जाधव, सरपंच मधुकर वारंगे मेढा तलाठी प्रविण महाडिक, प्रविण गवई,मंडळ अधिकारी विनायक सुतार, युवा कार्यकर्ते नागेश लोखंडे,मंगेश भगत, उपसरपंच मुकण मॅडम,आदी वासी बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाअंतर्गत जातीचे दाखले, सातबारा वाटप,शिधा पत्रिका, त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले आदी वासी बांधवांना वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment