कासार उद्योजक सामाजिक संस्था आयोजित  

"कोकण कासार प्रिमिअर लीग" 2022

पोलादपूर पि.टि.पि.एल ग्राउंडावर नुकतीच संपन्न

इंदापूर (प्रतिनिधी )कासार उद्योजक सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष गणेशजी साळवी यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी कोकण विभाग सो.क्ष. कासार व मध्यवर्ती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कासार प्रिमीअर लिग ची सुरूवात केली.

या वर्षी समाजबांधवानी उत्तम प्रतिसाद देत भरघोस निधी उपलब्ध केला या लिगचे व्यवस्थापन गोपाळकृष्ण मंडळ,ग्रामस्थ व महीला मंडळ चरई यांनी केले...जिल्हा परिषद सदस्य मा.चंद्रकांतशेठ कळंबे,मा.यशवंत कासार,अ.भा.मध्यवर्तीचे कोकण विभागीय अध्यक्ष मा.विलासजी कासार, सो.क्ष.कासार समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.दगडूशेठ साळवी,सचिव कमळाकर मांगले, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन तर प्रिमीअर लीगचे उद्घाटन पोलादपुर पंचायत समिती सदस्य मा.यशवंतजी कासार व प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांतशेठ कळंबे साहेब यांनी केले

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.अशोक गुरूजी,कमळाकरजी मांगले यांनी केले तर क्रिकेट काँमेंट्री मा.पत्रकार संदीप जाबडे, मा.प्रदीप वरंधकर, मा.उतेकर सर यांनी केले, स्कोर रेकार्ड मा.विशाल सर यांनी उत्तम केले, तर महिला अध्यक्षा रियाजी कासार आणी सौ. लिनाजी साळवी यांनी पाहुण्यांचे स्वागत करीत स्टेज व्यवस्था उत्तम साभांळली ,टेक्नीकली व कार्यक्रम प्रसिद्धी कार्य अस्वादजी वारे,व अक्षयजी साळवी यांनी उत्तम सांभाळले, तर संस्थेचे उपाध्यक्ष संतोषजी वारे, लहुजी मांगले,श्रीरंगजी वारे,राकेशजी साळवी यांनी प्रिमीअर लिग नियंत्रण व्यवस्था सांभाळत कार्यक्रम वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेतली.

या क्रिकेटच्या मेळाव्यात पूर्ण कोकणातून पाली,खोपोली,महागांव,चरई,राजीवली,जैतापूर.तुळशी,काटीवली,खेड, दापोली, शिवाय मुंबई,पुणे,दिव दमण,सिल्वासा अशा अनेक भागातून सो.क्ष.कासार समाजाचे बांधव व महीला आल्या होत्या शिवाय यु ट्युब लाईव्ह माध्यमातून देशा बाहेरही समाजबांधव क्रिकेटचा आनंद घेत होते.

 या प्रिमीअर लिग मध्ये प्रथम क्रमांकाची ट्राॕफी महागांवचे शिक्षण महर्षी म्हणून ओळख असणारे कै.सुरेशकाका साळवी यांच्या स्मणार्थ दिनेशजी साळवी यांनी दिली ती ट्राॕफी आसरे कासार वाडी "ड" संघ यांनी मिळवली

द्वितीय क्रमांकांची ट्राॕफी कै.गोपाळ मांगळे यांच्या स्मणार्थ मा.अरूणजी मांगले यांनी दिली ती महागांव "क" संघानी मिळवली तर तृतीय क्रमांकाची ट्राॕफी कै.दत्तात्रेय मांगले यांच्या स्मरणार्थ त्याचे सुपुत्र सचिन,सतिश, सागर यांच्या सौजन्याने देण्यात आली ती चरई "ब" संघाने मिळवली

तर चृतुर्थ प्रोत्साहन ट्राॕफी कासार उद्योजाक सामाजिक संस्थेच्या सर्व समाजधन दात्यांच्या माध्यमातून दिली ती ट्राॕफी आसरे कासारवाडी "क" संघाने मिळवली मॕन आॕफ दी सिरीज कै विजय साळवी स्मणार्थ ट्राॕफी किरणजी साळवी यांच्या वतिने दिली त्याचे मानकरी आॕल राउंडर प्रणितजी पोरे हे ठरले ,तर मॕन आॕफ दी मॕच साठी सर्व ट्राफी संदेशजी कासार यांनी दिल्या..उत्कृष्ट फलदांज ट्राफी मा.जयदिपजी वारे यांनी दिली, उत्कृष्ट गोलंदाज मा.पो निरिक्षक आत्मारामजी कासार यांच्या स्मणार्थ मा.राजेंद्रजी कासार यांनी दिली, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ट्राॕफी मा.प्रसादजी साळवी यांनी दिली, आसरे-कासारवाडी अव्वल अष्टपैलु खेळाडू मध्यवर्ती मंडळाचे पाली कासारवाडी तालुका अध्यक्ष निरंजनी मांगले व मध्यवर्तीचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रणितजी पोरे यांनी विजेता संघास सर्व खेळाडूंना मेडल्स दिले सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष दिपकजी कासार यांनी बॉल बाॕक्स व्यवस्था केली तर आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्य मा.कुमाराजी लोखंडे यांच्या कडून सर्व खेळाडूंना टोप्या वाटण्यात आल्या, आल्पोपहार गणेशजी साळवी , भोजन निधी सामाजिक संस्थेचे खजिनदार मा.निलेशजी वारे यांनी दिले,तर थंड पेय व पाणी व्यवस्था सामाजिक संस्थेचे सहसचिव मा, दिपकजी मांगळे यांनी केली. ह्या प्रिमीअर सगळ्या समाजाला घरी बसून बघता याव्यात यासाठी यु ट्युब लाईव्ह व्यवस्था उद्योजक मा.सुभाषजी पोरे,सामाजिक संस्थेचे सचिव श्री.श्रीरामजी मांगळे, व उद्योजक प्रमोदजी लोखंडे यांनी केले.

कोकण कासार प्रिमिअर लीग यशस्वी झाल्या त्याचे आभार प्रदर्शन संपर्क प्रमुख प्रसादजी साळवी यांनी केले.

Comments

Popular posts from this blog