खांब चिल्हे देवकान्हे विभागात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील खांब चिल्हे देवकान्हे विभागात खांब देवकान्हे विभागातील मौजे खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, बाहे, देवकान्हे,सह विभागात ठीक ठिकाणी बहुजन प्रतिपालक ,कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते होय सर्व धर्म समभाव ,समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेव उद्वितीय छ. शिवरायांची शिवजयंती भारत वाशियांचा राष्ट्रीय उत्सव आहे ,आणि या उत्सवाचे औचित्य साधून स्वा.सु.नि.अलीबागकर महाराज,गोपालबाबा वाजे,धोंडू बाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वे जन्मोत्सव सोहळा शनिवार दि.१९/२/२०२२ रोजी खांब देवकान्हे विभागात राजे शिवरायांची जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली, 

ज्ञानांकुर इंग्लिश मेडिअम स्कूल खांब,राजिप शाळा खांब,नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा ग पोटफोडे मास्तर विद्यालय व कै द ग तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब,राजिप शाळा नडवली,राजिप शाळा तळवली तर्फे अष्टमी,राजिप शाळा चिल्हे ,तसेच पत्रकार रायगड भूषण डॉ श्यामभाऊ लोखंडे यांच्या निवस्थांनी यशवंत नथू लोखंडे स्मूर्ती सार्व व वाचनालय व ग्रंथालय ग्रामस्थ व युवक मंडळ चिल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात यावेळी ग्रुप ग्राम पंचायत तळवली तर्फे अष्टमीच्या सदस्या सौ रिया लोखंडे ,रवींद्र लोखंडे,कल्पेश महाडिक,अविष्कार खांडेकर,अमर महाडिक, सौ पूजा लोखंडे,आदी शिवप्रेमी युवक उपस्थित होते,राजिप धानकान्हे,आ.वाडी,राजिप शाळा बाहे,राजिप शाळा देवकान्हे, या विविध ठिकाणी लहांनापासून आभालवृद्ध नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदायी वातावरण छ. शिरायांना मानवंदना व जय घोषात विविध ठिकाणी तसेच विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला,

Comments

Popular posts from this blog