रोह्यात राजभाषा दिनानिमित्त "निवडक कुसुमाग्रज" हा कार्यक्रम संपन्न
रोहा (राजेश हजारे)कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा व भाटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २७ फेब्रुवारी 2022 रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त "निवडक कुसुमाग्रज" या कार्यक्रमाचे आयोजन भाटे वाचनालय रोहा येथे करण्यात आले.रायगड भुषण श्री सुखद राणे व भाटे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष श्री . किशोर तावडे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सौ . संध्या दिवकर यांनी सांगितले .
को.म. सा. प.शाखा रोहाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ संध्या दिवकर यांनी प्रास्ताविकात कुसुमाग्रजांचे साहित्य आपल्याला जगण्यास शिकवते, प्रेरणा देते असे सांगितले . श्री बाबाजी धोत्रे, श्री विजय दिवकर, श्री सुधीर क्षिरसागर , सौ . वृशाली देशमुख ,सौ वर्षाराणी मुंगसे , श्री घागसर सौ . सुप्रिया क्षिरसागर , कु .निकीता बोथरे कु . वृद्धी भगत कु . स्वराज दिवकर . यांनी कुसुमाग्रजांचे निवडक लेख व कविता सादर करून रसिकांची मने जिंकली .श्री किशोर तावडे , अध्यक्ष, भाटे सार्वजनिक वाचनालय रोहे .यांनी आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमासाठी मा श्री मकरंद बारटक्के, रायगड जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली . कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी बोलताना ते म्हणाले की नटसम्राट सारख्या एखादया नाटकातील एक जरी संवाद ऐकला तरी आपला आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो . ध्येय श्रेष्ठ असेल तर तो मनुष्य आपल्या ध्येयाने श्रेष्ठ होतो . आपल्या संकल्पाप्रती आपली आत्मियता हवी . उत्तम साहित्य आपल्याला संस्कारीत करतात . चांगले साहित्य वाचले तर येणारी पिढी नक्कीच संस्कारीत होईल असा विश्वास त त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला .या कार्यक्रमास पत्रकार श्री . सचीन साळुंके व श्री हजारे उपस्थित होते .
या कार्यकमासाठी श्री . किशोर तावडे श्री . सुखद राणे , सौ संध्या दिवकर,श्री कुलकर्णी ,श्री . विजय दिवकर यांनी विशेष मेहनत घेतली . सुत्रसंचालन श्री नारायण पानवकर व कु निकीता बोथरे यांनी केले.आभार श्री सुधीर क्षीरसागर यांनी मानले .
Situs Judi Slot Online Gacor & Terpercaya 2021 - JTHub
ReplyDeleteDaftar Slot Online Gacor Terpercaya 2021 창원 출장안마 situs judi slot online 안동 출장샵 terpercaya 2021 정읍 출장샵 terpercaya 창원 출장안마 2021. 강릉 출장마사지 bersama slot online deposit pulsa terbaik, pragmatic play dapatkan