शिक्षण प्रसारक मंडळ शिहू तर्फे 'नीट' परीक्षेतील टाॅपर संयुजा खाडे हिचा सत्कार 

 रायगड (भिवा पवार )राष्ट्रीय स्तरावरील ' नीट ' परीक्षेत ९९.१० पर्सेंटाइल गुण मिळवून मुंबईतील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविल्याबद्दल नागोठणे येथील कु. संयुजा टिळक खाडे ह्या विद्यार्थीनीचा शिक्षण प्रसारक मंडळ शिहू या संस्थेतर्फे शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सत्कार करण्यात आल्या. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ शिहूचे अध्यक्ष डाॅ. आर. एन्. शेळके , उपाध्यक्ष श्री. के.के. कुथे , मुख्याध्यापक श्री. जे.जे. पाटील, विज्ञान शिक्षक श्री. आर. एल्. जाधव तसेच कु. संयुजाचे वडील श्री. टिळक खाडे व आई सौ. गीता खाडे उपस्थित होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात शिक्षण घेऊन कोणताही खासगी कोचिंग क्लास न लावता स्वयंअध्ययन व कठोर परिश्रम करुन संयुजाने हे दैदीप्यमान यश मिळवले आहे . या यशाबद्दल सर्वच स्तरांतून संयुजाने कौतुक होत आहे. दहावीमध्ये ही संयुजाने ९८ टक्के गुण मिळवून ती रायगड जिल्ह्यात अव्वल ठरली होती. भविष्यात न्यूरो सर्जन होण्याचा मानस यावेळी संयुजाने व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog