सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत आदीवासी बांधवांना दाखले वाटप

     तळा तालुक्यात कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत महागाव आदीवासीवाडीत प्रभावी अमंलबजावणी

तळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्यातील महागाव आदी वासी वाडीवर  सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत कातकरी उत्थान अभियानाची प्रभावि अमंलबजावणी रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर यांचे आदेशाने तळा तहसिलदार अण्णाप्पा कन्नशेटटी यांचे मार्गदर्शनाखाली दाखले वाटप करण्यात आले

   स्वातत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या तालुक्यातील आदी वासी बांधवांना दाखले वाटप करताना महागाव आदीवासीवाडी येथे जातीचे दाखले -१५०, सातबारा उतारा १७५, उत्पन्नाचे दाखले त्याचबरोबर शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले.

  यावेळी महसुल सहाय्यक विश्र्वास पाटील यांनी आदिवासी बांधवांना, महसुल,कृषी योजना, याविषयीविस्तृत माहिती दिली.यावेळी सर्वहराजनआदोंलनाचेज.वि.गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,   महागाव तलाठी बी.जी.बासांबेकर यांनीही मार्गदर्शन केले.गावचे पोलीस पाटील कमलाकर मांगले, निवृत्त शिक्षक अनंत वारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog