पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत खांब कोलाड मार्गावर घडली घटना ,

चार कर्मचारी जखमी, धारकाचे मोठे नुकसान 

कोलाड ( श्याम लोखंडे )मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील नागोठणे कोलाड मार्गावरील खांब नजीक पुगाव गावाजवळ व स्टॉपवर असणाऱ्या रुपेश अधिकारी यांच्या चहा च्या टपरीत घुसून हा अपघात घडला असून यातील प्रवास करणारे चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबस सह टपरीचे अतोनात नुकसान झाले आहे .

या बाबत सविस्तर माहिती खांब कडून कोलाड कडे जाणारी पोलीस मिनीबस गाडी क्र. एम. एच.०६ के ९९३० ही शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सदरच्या मार्गावरून प्रवास करीत असता यावरील वहान चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे सदर घडलेल्या आपघात घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब उपचारासाठी हलविण्यात आले.

जखमीचे नाव- १) पोहवा /९१ चव्हाण किरकोळ २)पोशी /८२५ बोरकर किरकोळ ३) पोशी ८५९ पांचाळ किरकोळ ४) पोशी/९९२पोशी पांचाळ किरकोळ ५)पोशी /८४८६ दळवे मुकामार ) पोशी /१४२६ धुळगडे मुकामार ७)पोशी /९८६ चव्हाण मुकामार ८)पोशी ८९9 लहारे मुकामार 9)पोशी १०३९ मुसळे मुकामार १०)पोशी /१२०४ शेटकर मुकामार .

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील पोलीस मिनी बस क्र एम एच ०६ के ९९३० वरील चाळक संजय अण्णा चव्हाण पोहवा /९१ रा. गोरेगाव ता. माणगाव यांनी आपल्या ताब्यातील वाहन खांब बाजूकडून माणगाव बाजूकडे मुंबई-गोवा हायवे रोड वर चालवून घेऊन जात असताना मिनी बस रोडच्या साईडला जाऊन सद्गुरु चहा टपरीत घुसून बाजूला असलेल्या नारळाच्या झाडास ठोकर मारून अपघात झाला .

सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजिट मार्गदर्शन विभागाचे ए एल पोसई श्री घायवट यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची मो.अ. न. २/२०२२ नोंद करत अधिक तपास करत आहेत .

Comments

Popular posts from this blog