प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी तर्फे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ५२ गांव ६५ वाड्यांत मोहिम

सुतारवाडी :  (हरिश्चंद्र महाडिक)प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्या मार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत असलेल्या 52 गांव, 65 वाड्यांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून 69 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.

             जर काही लाभार्थी 27 फेब्रुवारीलालाभ घेवू शकणार नाहीत. अशांसाठी 28 फेब्रुवारीला घरोघरी जाउन पल्स पोलिओ मोहिम यशस्वी केली जाणार आहे. गावोगावी ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी ची रुग्णवाहिका घेवून कर्मचारी वर्ग पल्स पोलिओचे महत्व पटवून देत आहेत. यासाठी प्रचार मोठ्या प्रमाणावर गावो गावी केला जात आहे.

                 ही पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडीचे वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश वाघ, डॉ. वैभव तिवळे, डॉ. दर्शना वरुटे तसेच आरोग्य सहाय्यक एस. आर. गायकवाड, पी.एम.वारे, आर. आर. पानसरे, आरोग्य सेवक एम. जी. पवार, जी. एम. शिरसाठ, एस. व्ही. रुगे, एन.जी. सानप त्याच प्रमाणे आशा अंगणवाडी शिक्षिका आणि आरोग्य कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. श्री. अमर  आंब्रस्कर  सुद्धा विशेष परिश्रम घेत आहेत.


Comments

Popular posts from this blog