एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे दिव्यांगांना आवश्यक साहित्य वाटपासबंधीचे तपासणी शिबिर संपन्न

  रोहा (समीर बामुगडे)  दिव्यांगाना आवश्यक साधन साहित्य वाटपासाठीचे दोन दिवसांचे तपासणी व नोंदणी शिबिर महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांच्या सी आर एस योजनेतंर्गत व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को ) यांच्या मदतीने सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र, कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र आणि एम जी एम हॉस्पिटल कामोठे यांच्या सहयोगाने एम जि एम हॉस्पिटल कामोठे पनवेल येथे संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटनसंयुक्तांग एवं ऋग्वांग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ उत्तरा देशमुख आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्रचे सचिव शिवाजी पाटील ,गौरीच साळुंखे पी अँड ओ, कृष्णा मौर्या ऑडियोलोजिस्ट यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ उत्तरा देशमुख मॅडम यांनी दिव्यांगानीं या आवश्यक साधनाचा वापर केला तर कोणाच्यावर अवलंबून राहणार नाही व तो स्वावलंबी होइल असे मार्गदर्शन केले.


पनवेल तालुक्यातील आणि नवी मुंबईतील दिव्यांगाना कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे याची तपासणी अलिम्कोचे गौरिच सालुके, कृष्णा मोर्य, आणि त्यांच्या टीमने आणि डॉ. उत्तरा देशमुख यांचे सहकारी असिस्टंट प्रोफेसर डॉ. सुभासिष पैकरे, फॅकल्टी डॉ प्रतीक्षा शेलार, ऍडमिन स्टाफ आकाश कटारिया , श्रीमती विमल चौलकर आणि स्टुडंट्स यांनी दोन दिवसीय शिबिरामध्ये सुमारे ३०० दिव्यांगाची नोंदणी करुन तपासणी केली तसेच हे शिबिर संपन्न करण्यासाठी सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्रचे सचिव शिवाजी पाटील, पनवेल तालुकाध्यक्ष रविंद्र शेलार, पेण तालुकाध्यक्ष मंगेश म्हात्रे, नवमान पटेल, निंबा सोळुंके, कैलास तुपे,मंगेश पारटे, किसन साठे, कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष शशांक हिरवे, जिल्हाध्यक्ष कल्पेश तवळे, बुसचे रायगड जिल्हाध्यक्ष गणेश म्हामनकर, सचिव राजु वाघमारे यांनी या शिबिरासाठी प्रयत्न केले अशी माहिती सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थाचे सचिव शिवाजी पाटील यांनी दिली.

तसेच ज्यांनी या शिबिराची प्रसिद्धी केली असे आमचे पत्रकार बंधू आणि एम जी एम हॉस्पिटल कामोठे यांनी शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.


Comments

  1. Hi Dr. Uttara Deshmukh, congratulations to you and your team for such a great job, totally dedicated to your profession and wellbeing of your patients. Keep it up.

    ReplyDelete
  2. Nice experience of work with Dr. Uttara mam & team.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog