Posts

Image
  शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा  भिवंडी (प्रतिनिधी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित शारदा विद्यालय पडघा येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  भिवंडी तालुक्यातील शारदा विद्यालय पडघा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ जाधव  तसेच समाजसेवक व उद्योजक  सचिन बिडवी  हे उपस्थित होते.यावेळी ध्वजारोहण उपसभापती गुरुनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.  दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजन समाजसेवक सचिन बिडवी यांच्या हस्ते करण्यात आले विद्यालयातील शिक्षक श्री.केदार सरांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल भालेराव यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या विभूतींची माहिती प्रस्ताविकेत करून दिली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन, पोवाडे, सादर केले. तसेच डोळे दिपवणारे मानवी मनोरे, कवायती, यांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक  ठाकूर सर यांनी केले तर कवयात,मा...
Image
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण,    कल्याणच्या नूतन विद्यालयाच्या प्रांगणात  'शिवकल्याण राजा' अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर,   चिमुकल्यांच्या हातांनी सजलेल्या 'शिवकल्याण राजा'या हस्तलिखिताचे झाले प्रकाशन.... कल्याण ( प्रतिनिधी )छत्रपती शिवाजी महाराज  म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष* पूर्ण झाली.याच प्रसंगाचं औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण (पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक) येथे संपूर्ण वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम करण्यात आले. दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी नूतन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात *शिवकल्याण राजा* हा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ, छत्रपती शिवरायांचा जन्मकाळ, स्वराज्यासाठी लढलेल्या अनेक मावळ्यांचा लढा आणि छत्रपतींचा राज्याभिषेक असे  अविस्मरणीय नाट्य सादरीकरण या निमित्ताने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी 350 दिवे प्रज्वलित क...
Image
  प्रथमच साबळे स्मृती प्रतिष्ठान व छेडा गृप, संयुक्तपणे खास "माणगांव महोत्सव २०२३"चे आयोजन उतेखोल / माणगांव दि.३ नोव्हेंबर(रविंद्र कुवेसकर)  शुक्रवार दिनांक ०३ नोव्हें.२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वा. लोकनेते अशोकदादा साबळे विद्यालयातील मोरेश्वर सभागृहात लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड. राजीव साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच प्रतिष्ठान अध्यक्ष समाधान उतेकर, कार्यकारी अध्यक्ष अरुण क्षिरसागर, उद्योजक नितीन बामुगडे, नगरीचे आरोग्य व स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, नगरसेविका तथा महिला संघटक शर्मिला सुर्वे, प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा स्वाती जाधव, साबळे विद्यालय मुख्याध्यापक धनाजी जाधव, दिलीप उभारे यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य व महिला सदस्य यांची संयुक्तीक सभा संपन्न झाली.         या भव्य महोत्सवाचे उदघाटन दि. ४ नोव्हे. रोजी महोत्सवाचे आयोजक हितेनशेठ छेडा, प्रमिला छेडा तसेच साबळे स्मृती प्रतिष्ठानचे प्रमुख ॲड. राजीव साबळे सर्व सदस्य व माणगावकरांचे खास उपस्थितीत संपन्न होणार असुन लोकनेते अशोक दादा साबळे स्मृती प्रति...
Image
डाॅक्टरांच्या संगीत प्रेमी म्युझिकल ग्रुपचा वर्धापन दिन संपन्न,   सुरेल आठवणीत वर्ष सरले कळलंच नाही! उतेखोल/माणगांव (रविंद्र कुवेसकर) माणगांवातील हौशी डाॅक्टरांच्या संगीत प्रेमी म्युझिकल गृपचा प्रथम वर्धापन दिन  दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला. हौशी लोकांना एकत्र जोडण्यात संगीताचे खरे सौंदर्य असते. 'संगीतम् सर्वत्र भ्राजते' म्हणजे संगीत सर्वाना प्रकाशमय करते. संगीत प्रेमी ॲड. मोहन मेथा, डॉ. सुकेशनी डोंगरे, डॉ. श्रीकांत वैद्य, डॉ. स्नेह राऊत, सौ. राऊत, डॉ. अजय मेथा, डॉ. अमीत मेथा, स्नेहल परांजपे, सौ. रजनी शेठ, सौ. दिक्षा देसाई, डॉ.सचीन चव्हाण, डॉ.अक्षरा चव्हाण, डॉ.अनुजा पाटसकर, राजा पोवार यांनी एकत्र येऊन माणगांवात एक समुह स्थापन केला याला एक वर्ष झालं हे वर्ष अनेक आनंददायक सुरेल आठवणीत कधी सरल ते या संगीतप्रेमींना कळलंच नाही अस त्यांनी म्हटल आहे. आपल्या संगीताच्या वेडापायी हा एक सुंदर, ग्रुप एकत्र येवून स्वत:ला आणि समाजाला आपल्या गायनाच्या कलागुणांतुन निखळ आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व सहभागातून एक वर्षापूर्वी त्यांनी आपल्या या सुरेल मैफीलीचा पहिला ...
Image
  पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अमलबजावणी करा, रोह्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन रोहा (प्रतिनिधी) राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.पत्रकारांच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर २०१९ रोजी हा कायदा राज्यात अमलात आला. मात्र त्यानंतरही राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी न होता ते दिवसेंदिवस वाढतच राहिलेले पहायला मिळत आहे.नुकतेच पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.मात्र पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत याप्रकरणी ही शासनाने कारवाई केली नाही. पाचोरा येथील घटनेमुळे राज्यभरातील सर्वच पत्रकारांचे मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आज याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी या कायद्याची होळी करत अमलबजावणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदने दिली. रोहा शहरातील सर्व सक्रिय पत्रकारांनी तहसीलदार डॉ.किशोर देशमुख यांचेमार्फत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.    यावेळी पत्रकार महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, अमोल पेणकर, जितेंद्र जोशी,नितीश सकपाळ,मारुती फाटक,महेश मोहिते आदी पत्रकार उपस...
Image
  संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उदघाटन   रोहा :( राजेश हजारे)  जैन समाजाचे परम पूज्य आचार्य भगवंत राष्ट्रीय संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात ८२ पिशव्या रक्त जमा करण्यात आले. ओसवाल भवन येथे भारतीय जैन संघटना, सकल जैन संघ रोहा आणि चंद्रदर्शन युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य आचार्य भगवंत राष्ट्रीय संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी जैन सकल संघ अध्यक्ष दिलीप सोळंकी, भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष दिवेश जैन, गटनेते मह्रेंद्र गुजर, मा. उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन,  अखलाक नाडकर, मयुर पायगुडे, भाजपा शहर...
Image
जगात जर सर्वश्रेष्ठ कोणती संस्कृती असेल, तर ती वाचन संस्कृती:- शंकरराव म्हसकर रोहा :(प्रतिनिधी)जे थे वाचन होते, तिथे विचार होतात आज हेच विचार आपली ध्येय ठरवायला आणि गाठायला मदतही करतात. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातून संपत्ती निर्माण होते. वाचनामुळे आपले भावविश्व अनुभव विश्व विस्तारते. वाचन संस्कृतीची नाळ प्रत्येक माणसाची प्राचीन काळापासून जोडली गेली आहे आताच्या प्रगत व दमछाक करणाऱ्या युगामधे वाचनाची सवय मागे पडत चालली आहे ती वाढावी,रुजावी विशेष करून ग्रामीण भागातील जनतेत वाचनाच महत्त्व पटाव वाचन संस्कृती ग्रामीण भागात रूजावी व गावाचा शैक्षणिक सांस्कृतिक विकास व्हावा तसेच" जगात जर कोणती संस्कृती श्रेष्ठ असेल तर ती म्हणजे वाचन संस्कृती आहे, असे प्रतिपादन जेष्ठ शेकाप नेते शंकरराव म्हसकर यांनी केले.  आपल्या निवासस्थानी  ठेवलेल्या छोट्या कार्यक्रमात केली  यावेळी त्यांच्या भगीनी सौ.सुप्रियाताई क्षीरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितलेली की आमचे वडील  हरिभाऊ म्हसकर यांना पुस्तक वाचनाची खुप आवड होती मुंबई येथे  कापड मिलमधे काम करत असताना त्यांनी आपला वाचन  छ...