छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण, 

  कल्याणच्या नूतन विद्यालयाच्या प्रांगणात  'शिवकल्याण राजा' अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर,

 चिमुकल्यांच्या हातांनी सजलेल्या 'शिवकल्याण राजा'या हस्तलिखिताचे झाले प्रकाशन....

कल्याण ( प्रतिनिधी )छत्रपती शिवाजी महाराज  म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष* पूर्ण झाली.याच प्रसंगाचं औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण (पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक) येथे संपूर्ण वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम करण्यात आले.

दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी नूतन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात *शिवकल्याण राजा* हा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ, छत्रपती शिवरायांचा जन्मकाळ, स्वराज्यासाठी लढलेल्या अनेक मावळ्यांचा लढा आणि छत्रपतींचा राज्याभिषेक असे  अविस्मरणीय नाट्य सादरीकरण या निमित्ताने करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी 350 दिवे प्रज्वलित करून शिवरायांची महाआरती करण्यात आली हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते... विद्यार्थी पालक शिक्षक सर्वजण हे नाट्य पाहून भावमय झाले... सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाट्यसादरीकरणात नूतन संकुलातील इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते..

सध्याच्या काळात हॉलीवुड आणि बॉलीवूड गाण्यांनी जिथे मुलांना भुरळ पाडली आहे तिथे आमच्या शिवरायांचा इतिहास उलगडून विद्यार्थ्यांच्या मनामनात तो भिनवून त्याचे सादरीकरण करण्याचे काम नूतन विद्यालय कल्याण या शाळेने केले आहे.. याबद्दल शाळेचा हा  नाट्य प्रयत्न वाखण्याजोगा आहे... सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन नूतन विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेश्मा सय्यद मॅडम. पर्यवेक्षक श्री. विजय भामरे सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.भारती वेदपाठक मॅडम( चिटणीस. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण) आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व  सौ.दिपाली साबळे मॅडम यांनी केले.

     सांस्कृतिक प्रमुख श्री. श्रीहरी पवळे सर सौ.मिताली बोकील मॅडम श्रीमती जाहिरा तडवी मॅडम सौ शुभांगी भोसले मॅडम  यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले.  कला शिक्षक श्रीहरी पवळे सर  यांनी प्रस्तुत नाट्यात क्रूरकर्मा अफजल खान आणि  निवेदकाची भूमिका केली आणि प्राथमिक विभागाचे श्री शेडगे सर यांनी  शिवरायांची भूमिका यशस्वीरित्या सादर केली  आणि विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढवला. सर्व शिक्षक वृंदाची साथ पालक विद्यार्थी यांचे सहकार्य यामुळे हा कार्यक्रम दृष्ट लावण्याजोगा झाला.

केवळ नाट्य सादरीकरण नाही तर शिवाजी महाराजांबद्दल स्वतःचे विचार प्रत्यक्ष कागदावर उतरवून विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातांनी सजलेल्या *शिवकल्याण राजा* या *हस्तलिखिताचे* देखील प्रकाशन करण्यात झाले.. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर.प्रशांत पाटील ,छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष माननीय प्रा.श्री नारायण  फडके ,कोषाध्यक्ष मा.श्री धनंजय पाठक,  सरचिटणीस माननीय. डॉ.श्री. निलेशजी रेवगडे,,मा.श्री.अविनाश नेवे  मा.श्री.महेश देशपांडे  आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेवरील  स्नेहापोटी अनेक माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. अशाप्रकारे *शिवकल्याण राजा.* हे  *महानृत्य नाट्य* पाहून प्रत्येक जण मनामध्ये अभिमान घेऊन मार्गस्थ झाला.

Comments

Popular posts from this blog