प्रथमच साबळे स्मृती प्रतिष्ठान व छेडा गृप, संयुक्तपणे खास "माणगांव महोत्सव २०२३"चे आयोजन

उतेखोल / माणगांव दि.३ नोव्हेंबर(रविंद्र कुवेसकर) शुक्रवार दिनांक ०३ नोव्हें.२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वा. लोकनेते अशोकदादा साबळे विद्यालयातील मोरेश्वर सभागृहात लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड. राजीव साबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच प्रतिष्ठान अध्यक्ष समाधान उतेकर, कार्यकारी अध्यक्ष अरुण क्षिरसागर, उद्योजक नितीन बामुगडे, नगरीचे आरोग्य व स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, नगरसेविका तथा महिला संघटक शर्मिला सुर्वे, प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा स्वाती जाधव, साबळे विद्यालय मुख्याध्यापक धनाजी जाधव, दिलीप उभारे यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठान कार्यकारिणी सदस्य व महिला सदस्य यांची संयुक्तीक सभा संपन्न झाली. 

       या भव्य महोत्सवाचे उदघाटन दि. ४ नोव्हे. रोजी महोत्सवाचे आयोजक हितेनशेठ छेडा, प्रमिला छेडा तसेच साबळे स्मृती प्रतिष्ठानचे प्रमुख ॲड. राजीव साबळे सर्व सदस्य व माणगावकरांचे खास उपस्थितीत संपन्न होणार असुन लोकनेते अशोक दादा साबळे स्मृती प्रतिष्ठान व हितेन छेडा गृपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "माणगांव महोत्सव २०२३" साठी गांधी मैदान, नाणोरे पेट्रोलपंप शेजारी, मुंबई गोवा हायवे येथे होणाऱ्या कार्यक्रमांची पूर्व तयारी व रुपरेषा ठरविण्यात आली आहे. 

   दिनांक ०४ ते १५ नोव्हें. २०२३ रोजी सायं. ०५ .०० ते रात्री १० .०० वाजेपर्यंत विशेष आकर्षक कार्यक्रम पुढील प्रमाणे एम्युझमेंट पार्क, विविध वस्तुंच्या स्टॉलचा मेला, खाद्य पदार्थांची लयलुट व गमतीदार खेळांचे स्टॉल्स, टू ॲण्ड फोर व्हिलर लोन मेला, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. 

       दि.५ नोव्हे. रोजी लाईव्ह डान्स, दि.६ नोव्हें. रोजी साबळे विद्यालय व दि.७ नोव्हे. रोजी एस एन शिपूरकर व श्रध्दा इंग्लिश मिडियम स्कुल विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, दि.८ नोव्हे. रोजी खास आकर्षण म्हणजे मुळ माणगांवचे सुपुत्र सुप्रसिध्द जादूगार "निनाद पवार" यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. दि.९ नोव्हें. रोजी माणगांव ज्युनियर काॅलेज व दि. १० नोव्हे. रोजी द.ग. तटकरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रेकाॅर्ड डान्स कार्यक्रम, दि.११ नोव्हे. रोजी माणगांव मधिल हौशी कलाकार संगीत प्रेमींचा म्युजिकल ऑर्केस्ट्रा होणार आहे.

  तसेच दि.१२ नोव्हें. रोजी गृप डान्स व सोलो डान्सची विशेष स्पर्धा होणार असुन स्पर्धेतील विजेत्यांसाठी गृप डान्स साठी अनुक्रमे प्रथम ७,००० /- , द्वितीय ५,००० /-, तृतिय ३,००० /- रुपयांचे पारितोषीक व सोलो डान्स साठी अनुक्रमे प्रथम ५,०००/- द्वितीय ३,००० /- व तृतिय २,००० /- रुपयांचे पारितोषीक देण्यात येणार आहे. दि.१३ नोव्हे. पारंपारिक लावणी तर दि.१४ नोव्हें. रोजी "लोकधारा मराठी" तसेच दि.१५ नोव्हे. रोजी कोळी डान्स अशा विविध कार्यक्रमांची दिवाळीची पर्वणी असणार, माणगांवकरांनी महोत्सवाचा भरभरुन आनंद घ्यावा असे अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतिने सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog