संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उदघाटन

 रोहा:( राजेश हजारे) जैन समाजाचे परम पूज्य आचार्य भगवंत राष्ट्रीय संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात ८२ पिशव्या रक्त जमा करण्यात आले.

ओसवाल भवन येथे भारतीय जैन संघटना, सकल जैन संघ रोहा आणि चंद्रदर्शन युवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने परम पूज्य आचार्य भगवंत राष्ट्रीय संत श्री चंद्राननसागर सुरीश्वरजी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले आहे.

 यावेळी जैन सकल संघ अध्यक्ष दिलीप सोळंकी, भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष दिवेश जैन, गटनेते मह्रेंद्र गुजर, मा. उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, मा.उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन,  अखलाक नाडकर, मयुर पायगुडे, भाजपा शहराध्यक्ष यज्ञेश भांड, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, माधवी दाते, शहर अध्यक्ष अमित उकडे, राकेश जैन, वसंत कोठारी, कैलास जैन, प्रशांत जैन, सुनिल कोठारी, सनी जैन, सागर जैन,  सौ कुसुमताई सोलंकी, भारतीय जैन संगठना माहिला अध्यक्ष मनीषा जैन, विजया कोठारी,  हर्षा जैन, लिची जैन,  हर्षा चांडालिया ,पायल जैन, छाया जैन, मनीषा जैन, शर्मिला जैन, टीना जैन, शितल जैन, दृष्टी चांडालिया, मनीषा लोढा, निकिता कांकरिया, जैन समाज बांधव, महिला वर्ग यांसह सर्व सामाजिक संस्था मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना उद्धव ठाकरे गट दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, दीपक तेंडुलकर, ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी, माजी सभापती समीर सकपाळ, रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी सदिच्छा भेट दिली. शिबिरासाठी भारतीय जैन संघटना, सकल जैन संघ रोहा आणि चंद्रदर्शन युवा मंचाचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी  विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढी अलिबाग' चे सर्व टीमने सहकार्य केले. जिल्हाध्यक्ष दिवेश जैन यांनी  रक्तदात्यांचे, सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog