पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची अमलबजावणी करा, रोह्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

रोहा (प्रतिनिधी)राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.पत्रकारांच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर २०१९ रोजी हा कायदा राज्यात अमलात आला. मात्र त्यानंतरही राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी न होता ते दिवसेंदिवस वाढतच राहिलेले पहायला मिळत आहे.नुकतेच पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.मात्र पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत याप्रकरणी ही शासनाने कारवाई केली नाही. पाचोरा येथील घटनेमुळे राज्यभरातील सर्वच पत्रकारांचे मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आज याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी या कायद्याची होळी करत अमलबजावणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदने दिली. रोहा शहरातील सर्व सक्रिय पत्रकारांनी तहसीलदार डॉ.किशोर देशमुख यांचेमार्फत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. 

  यावेळी पत्रकार महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, अमोल पेणकर, जितेंद्र जोशी,नितीश सकपाळ,मारुती फाटक,महेश मोहिते आदी पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog