डाॅक्टरांच्या संगीत प्रेमी म्युझिकल ग्रुपचा वर्धापन दिन संपन्न,

 सुरेल आठवणीत वर्ष सरले कळलंच नाही!

उतेखोल/माणगांव (रविंद्र कुवेसकर)माणगांवातील हौशी डाॅक्टरांच्या संगीत प्रेमी म्युझिकल गृपचा प्रथम वर्धापन दिन  दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला. हौशी लोकांना एकत्र जोडण्यात संगीताचे खरे सौंदर्य असते. 'संगीतम् सर्वत्र भ्राजते' म्हणजे संगीत सर्वाना प्रकाशमय करते. संगीत प्रेमी ॲड. मोहन मेथा, डॉ. सुकेशनी डोंगरे, डॉ. श्रीकांत वैद्य, डॉ. स्नेह राऊत, सौ. राऊत, डॉ. अजय मेथा, डॉ. अमीत मेथा, स्नेहल परांजपे, सौ. रजनी शेठ, सौ. दिक्षा देसाई, डॉ.सचीन चव्हाण, डॉ.अक्षरा चव्हाण, डॉ.अनुजा पाटसकर, राजा पोवार यांनी एकत्र येऊन माणगांवात एक समुह स्थापन केला याला एक वर्ष झालं हे वर्ष अनेक आनंददायक सुरेल आठवणीत कधी सरल ते या संगीतप्रेमींना कळलंच नाही अस त्यांनी म्हटल आहे.

आपल्या संगीताच्या वेडापायी हा एक सुंदर, ग्रुप एकत्र येवून स्वत:ला आणि समाजाला आपल्या गायनाच्या कलागुणांतुन निखळ आनंद देण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्व सहभागातून एक वर्षापूर्वी त्यांनी आपल्या या सुरेल मैफीलीचा पहिला कार्यक्रम मिले सूर मेरा तुम्हारा नावाने माणगांवच्या डॉ.गौतम राऊत यांच्या बंगल्यावर पहिला सराव करीत दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी सादर केला. एक वर्षापूर्वी दहीहंडी नंतर गृपचा शुभारंभाचा कार्यक्रम तिनशे लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला हे विशेष.

यामुळे या हौशी ग्रुपचा उत्साह आणखीन वाढत गेला आणि शिरवली येथील विठ्ठल मंदिरात त्यांनी भक्ती गीतांचा बैठा कार्यक्रम गृप मधिल सुरेल सदस्या परांजपे मॅडम आणि शिरवलीकर यांच्या विनंतीला मान देऊन केला. गृप मधिल ॲक्टीव्ह सदस्य कला शिक्षक राजा पोवार यांचे घरी १६ सोमवार व्रताचे निमीत्ताने या संगीत प्रेमीना आमंत्रित करुन झालेल्या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला. तसेच डाॅ. मोहन मेथा यांच्या कन्येचा विवाह समारंभास व डाॅ.अक्षरा सचिन चव्हाण यांनी त्यांचे मुलाचे स्वागत समारंभास देखील गृपला बोलावून कार्यक्रम झाला. या अनोख्या गृपने आनंदाने एकत्र येत एक दिवसाची अविस्मरणीय दीवेआगर पिकनिक देखील आयोजित केली.

माणगांव मधिल नेत्ररोग तज्ज्ञ डाॅ. श्रीकांत वैद्य यांचा वाढदिवस या गृपने हॉटेल सुयश तळेगाव येथे तर डॉ. सुकेशनी डोंगरे यांचा वाढदिवस त्यांच्याच घरी साजरा केला. याप्रसंगी भावनिक होऊन माझा हा वाढदिवस सुरेल गृपमुळेच आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण ठरला अशी प्रतिक्रिया डाॅ. श्रीकांत वैद्य यांनी व्यक्त केली. बघता बघता वर्ष संपले आणि संगीतप्रेमी गृपचा देखील वाढदिवस जरा हटकेच साजरा करण्यासाठी डॉ.अमीत मेथा व राजा पोवार यांचे संकल्पनेतून कशेणे येथील झोपडी हाॅटेलला दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्व गायकांचे कौटुंबिक सदस्य सुध्दा प्रोत्साहन देत, मिले सुर मेरा तुम्हारा म्हणत गृप मध्ये सहभागी होत आहेत.  हौशी संगीत प्रेमींना या समुहाने एका धाग्यात बांधुन ठेवले आहे.


हाच तो अनोखा हौशी माणगांवकरांचा संगीतप्रेमी गृप आपल्या समुहाच्या पहिल्या वर्धापन दिनी हर्षोल्हासीत होऊन मिले सुर मेरा तुम्हारा म्हणत एका माळेत घट्ट गुंफला गेला आहे हे छायाचित्रात दिसत आहे.(छायाचित्र : रविंद्र कुवेसकर, उतेखोल माणगांव)

Comments

Popular posts from this blog