Posts

Image
  गोरेगाव दोशी वकील महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा            प्रतियोगिता परीक्षांच्या 500 ग्रंथ                   मासिकांचे प्रदर्शन    गोरेगाव (सृष्टी पवार) माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी सी यु बी सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गोरेगाव - रायगड येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आणि करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते.  यामध्ये विविध प्रकाशनाची सुमारे 500 स्पर्धा परीक्षा पुस्तके मासिके, चालू घडामोडी इ. पुस्तके ठेवण्यात आली होती.  प्राचार्य डॉ. जनार्दन होटकर सर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. करियर कट्टा समन्वयक डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांची माहिती करून दिली. ग्रंथपाल डॉक्टर गणेश सानप यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक...
Image
  गोरेगाव -रायगड येथील दोशी वकील महाविद्यालयात करियर कट्टा मार्गदर्शन आणि इंडक्शन कार्यशाळा संपन्न   गोरेगाव:(सृष्टी पवार) माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी. सी. यु. बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, गोरेगाव, तालुका - माणगाव, जि.रायगड, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये करियर कट्टा इंडक्शन-जागृती कार्यशाळा शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडली.  याप्रसंगी करिअर कट्टा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होटकर सर यांनी मार्गदर्शन केले. करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. सुभाष कदम आणि डॉ. गणेश सानप यांनी करिअर कट्टा आपल्याला स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार कसा बनवू शकतो, याविषयी विद्यार्थ्यांना इत्यंभूत माहिती दिली. करियर कट्टा विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध सोयी-  सुविधा आणि उपक्रमांविषयी चे व्हिडिओज मुलांना दाखवण्यात आले. करियर कट्टा च्या ॲप मध्ये...
Image
  शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा वहाळच्या नेत्रदीपक यश  पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे सन 2025 आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळ (ता. पनवेल, जि. रायगड) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत रुही नरेश पाटील (५९.३३%), आरोही रविशकुमार चौधरी (५८.००%), प्रतिक्षा किरण बेळ्ळे (५७.३३%), सोनिका सोपान माने (५२.६६%), प्रांसी तेजस म्हात्रे (४९.३३%), हिबा मोहम्मद अहमद खान (४८.६६%), महारुद्र नानासाहेब खेडकर (४६.६६%) आणि अनुष्का मनोज डांगे (४०.६६%) यांनी उल्लेखनीय गुण मिळवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे वर्गशिक्षिका सौ. श्रुतिका राजन पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य तसेच पालकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळच्या शैक्षणि...
Image
अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न  कष्टाविना विना फळ नाही, कष्ट करा यशाचा अभिमान बाळगा,गर्व करू नका,माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगा:- प्रा.नारायण फडके    कल्याण (प्रतिनिधी) नुकताच कल्याण येथील अभिनव विद्यामंदिर पारनाका येथे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित करण्यात आलेल्या   माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा 2026 च्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले "की  कष्टाविना फळ नाही, कष्ट करा यशाचा अभिमान बाळगा, गर्व करू नका,माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगा. असे प्रतिपादन प्रा.नारायण फडके यांनी केले ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते.  कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन   वंदे मातरम या गीताने झाली. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.नारायण फडके ,सरचिटणीस डॉ.निलेशजी रेवगडेतसेच  प...
Image
  रोहा तालुक्यातील घटना!       पुराच्या पाण्यामुळे गोवे       गावातील   रस्ता गेला वाहून भातशेतीचे मोठे नुकसान!     कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात गोवे गावातील रस्ता तीन चार दिवस पडलेल्या ढगफुटी सारख्या  तुफान पावसामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेला असुन या रस्त्यावरुन गोवे गावात जाण्यासाठी  रिक्षा,फोरव्हीलर व इतर वाहने जाण्यासाठी जागाच राहिली नसल्याने या मार्गांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याशिवाय या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेला राब पुराच्या पाण्यात कुजून गेल्याने भात लावणी करणे अशक्य झाले आहे. यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असुन याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.     हवामानाच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस कमी पडेल असे बोलले जात असतांना एक महिना उशीरा पावसाने सुरुवात केली असली तरी यानंतर ५ ते ८ जुलै रोजी पडलेल्या तुफान पावसामुळे एका क्षणात होत्याचे नव्हतं करून सोडले असुन रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्य...
Image
  आपल्या कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस,घरातील माय,गोठ्यातील गाय, सुरक्षित ठेवायची असेल तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज:-हभप गौरीताई सांगळे    लव्ह जिहाद! आणि  धर्मांतराबाबत वज्रमुठ आवळण्याचे आवाहन!  दहा हजाराचा मेकअप करा पण अंगभर कपडे घाला!  जिच्या अंगभर कपडे ती जगातली सुंदर स्त्री! हभप गौरीताई सांगळे यांचा तरुणींना आवाहन!     कोलाड (विश्वास निकम)  हिंदूंच्या रक्षणासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे.आपल्याला कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस, घरातील माय,गोठ्यातील गाय,सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे असे मत हभप गौरीताई सांगळे यांनी सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीतील आयोजित विराट हिंदू संमेलनात आपले मत व्यक्त  करतांना सांगितले     नात्यांचा आदर कसा करायचा असतो?बहीण भावाचे नाते नाते म्हणजे काय?पती पत्नीचे नाते काय असते? सासू सासऱ्याच्या आदर कसा करायचा?माता पित्याचेवर नतमस्तक कसे व्हायचे हे फक्त हिंदू धर्म शिकवतो.आपण शिवरायांचे वारसदार म्हणून जन्माला आलो आहोत.या ठिकाणी आपण जन्माला आलो आह...
Image
  आपल्या मृत्यू नंतर ही आपले नाव जगाने घेतले पाहिजे असे जिवन जगा:-हभप प्रियाताई निकम     कोलाड:- (विश्वास निकम) ज्या प्रमाणे आपल्या परिसरातील हभप पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ (बापू )यांनी समाजासाठी केलेले निस्वार्थी समाजकार्य यामुळे ते निघून गेल्यावर त्यांच्या आठवणी समाजात जागृत आहेत. यामुळे जिवन जगत असतांना असे जिवन जगा कि आपण निघून गेल्यानंतर ही आपले नाव समाजात घेतले पाहिजे असे मत हभप प्रियाताई गणेश निकम यांनी हेटवणे येथील निकम भावकीच्या कुळदेवीच्या श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले.               कुळीची हे कुळदेवी l केली ठायी संतांनी ll१ll बरवे जाले शरण गेलो l उगवलो संकटी ll ध्रु ll आणीला ही रुप बळे l करुनि खळे हरिदासी ll२ll तुका म्हणे समागमें l नाचों प्रेम लागलो ll३ll या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे हभप प्रियाताई निकम यांनी सांगितले कि आमच्या कुळातील कुळदेवीची संतांनी माहिती करून दिली बरे झालो मी शरण गेलो त्यामुळे माझी संकटे नाहीशी झाली. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनी देवी...
Image
  रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील घटना!   अवेळी पडणाऱ्या पावसात वीज पडून १४ वर्षीय  वेदांतचा दुर्दैवी  मृत्यू    वेदांत नुकताच आठवी पास झाला होता! तळा (प्रतिनिधी ) रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कर्नाळा येथे शनिवारी ९ मे रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज अंगावर पडून वेदांत जनार्दन भोसले या अवघ्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कर्नाळा ग्रामस्थांकडून तसेच पंचक्रोशी मधून  हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा अवकाळी पावसामुळे वाड्याजवळ गुरांना ठेवलेली पेंढे झाकण्यासाठी गेला होता. पेंढे झाकून झाल्यावर  वेदांतवर विज कोसळली  त्यात वेदांत गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेदांत हा अभ्यासात हुशार व शांत स्वभावाचा असून तो नुकताच आठवी पास झाला होता असे शिक्षक आ...
Image
    सुधागड तालुक्यातील घटना!  अवकाळीच्या पावसाच्या  तडाख्यात राजिप शाळा झाप शाळेचे पत्रे उडून मोठे नुकसान     कोलाड (विश्वास निकम )  संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवार दि.९ मे रोजी दुपारी २.३०  वाजण्याच्या  सुमारास वादळ वाऱ्यासह अवकाळी  पावसाने जोरदार हजरी लावली.यामुळे नागरिकांची मोठी तारांबल उडाली. या अवकाळीच्या तडाख्यात सुधागड तालुक्यातील झाप रायगड जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले असुन यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.    अचानक वादळ वाऱ्यासह तुफान पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उमळून पडली. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे व कौले उडाली यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.यामुळे विज पुरवठा खंडित झाला.तसेच बाजापेठेतील व्यवसायिकांसह नागरिकांची तसेच अनेक ठिकाणी हळदी व लग्न समारंभातील नागरिकांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.    याबरोबर वीटभट्टी व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे आंबा, काजु,फणस,या पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे अहवा...
Image
  द्वादशम हिंद केसरी बकासुराचे रोहा संभे येथील मैत्री चषक स्पर्धेत होणार आगमन,  हजारो क्रिकेट खेळाडूंसह रसिक प्रेक्षकांना घडणार दर्शन! कोलाड (श्याम लोखंडे) प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत गोवा रायडर्स ग्रुप आयोजित मैत्री चषक - २०२६ द्वादशम हिंदकेसरी देव याचे मैत्री चषक २०२६ क्रिकेटची पंढरी असलेल्या संभे मैदानावर शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता आगमन होत असल्याने क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंसह रसिक प्रेक्षक या साऱ्यांची उत्सुकता द्वादशम हिंद केसरी देव बकासुर याला पाहण्याची आणि त्याच्या दर्शनाची झाली आहे.  रायगड रोहा तालुक्यातील पुगाव गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत मैत्री चषक व रोहा तालुका असोसिएशन प्रीमियर लीग चषक स्पर्धा १४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत पाच दिवस भव्य दिव्य रजनी प्रकाशझोतातील स्पर्धेचे दिमाखदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच उदघाटन सोहळा मंगळवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर व आयोजक प्रमोद म्हसकर आदी...
Image
कोलाडमधील सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे लालासाहेब शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न!    असंख्य  चाहत्यांनी मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या दिवशी निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा!   मित्रमंडळी व जोडलेली माणसं ही माझ्या आयुष्यातील खरी संपत्ती:- लालासाहेब शिंदे  कोलाड (प्रतिनिधी )समस्या घेऊन जाणारा व्यक्ती जो कुठल्याही पक्षाचा असो! जातीचा असो! धर्माचा असो! त्याच्या समस्येचे निवारण होणारच त्याच्यातून मार्ग निघणारच!असे व्यक्तिमत्व म्हणजे  कोलाड मधील सामाजिक कार्यकर्ते  लालासाहेब शिंदे होय.  नुकताच लालासाहेब शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला मित्र मंडळींनी चाहत्यानी तुफान गर्दी केली होती. एखाद्या राजकारणी पुढाऱ्यालाही लाजवेल असा मोठ्या प्रमाणामध्ये मित्र मंडळी लालासाहेब शिंदे यांच्या घरी निवासस्थानी  जमले होते.  लालासाहेब शिंदे हे सर्वसामान्यांचे हाकेला धावणारी व्यक्तिमत्व अशी तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे. ते नवज्योत मित्र मंडळ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून समाजसेवेची व्रत हाती घेऊन राजकारणामध्ये सक्रीय असतात.  वरस...
Image
  अद्भुत दैवी शक्ती श्री क्षेत्र भातसई येथे महादेवीचे भगत गळ लाऊन आरूढ, हर हर महादेवाचे गजर,  भक्तांच्या उपस्थितीत गळाचा सोहळा, अनेकांच्या नयनांनी टिपला क्षण! कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई गावची स्वयंभू श्री महादाई महादेवी मातेचा पालखी व यात्रा उत्सव सोहळा मंगळवारी ३१ मार्च व बुधवारी १ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी उत्सवाच्या आदल्या दिवशी मंगळवारी दुपारी १२ वाजता देवीची पालखी मिरवणुक सोहळा गावहद्दीतील गावागावात सुरू करण्यात आला तर भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात केली तद्नंतर पालखी झोलांबे, कोपरे या गावात गेली.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर येथे फिरवून रात्री ७ वाजता आदर्शगाव  भातसई गावात घरोघरी भक्तीमय वातावर्नात ग्रामस्थ नागरीकांना दर्शन देत फिरून महादेवी मंदिरात आली.तर दुस-या दिवशी बुधवारी १ एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होताच सकाळ पासुनच भक्तगण नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत येत होते. सर्व रायगड जिल्ह्यातील व बाहेरून जिल्ह्यातील भक्तांचे जनसागर महादेवी आ...
Image
  कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,राम नवमीनिमित्त शोभायात्रा कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाक्यावर रामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.तर प्रभू श्री रामाच्या रामनवमी निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात पार पडले. आंबेवाडी कोलाड येथील श्री अंबर सावत मंदिर सभागृहात हिंदू संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आंबेवाडी कोलाड बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण भगवेमय आणि भक्तिमय झाले होते. सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी राम भक्तांकडून रामनवमी उत्सवाचे हे आयोजन करण्यात होते याचा उपस्थित राम भक्तांनी आनंद लुटला. शोभायात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक सजवून आणलेल्या बैलगाडीने सारेजण गेले भारावून  रामनवमीसाठी रामभक्तांकडून बाजारपेठेतील रस्त्यांवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कणा रांगोळी व फुलांची सजावट कारण्यात आली होती. तस...
Image
         गोरेगाव येथील कालभैरव जत्रा उत्सवात उंच खांबावरील लाट फिरवणे ठरत आहे मुख्य आकर्षण, भिनाड गावाच्या काठीला मुख्य मान     कोलाड (विश्वास निकम )  चैत्र महिना सुरु झाल्यानंतर कोकणात जत्रेची धामधूम खऱ्या अर्थाने होते.याप्रमाणे सालाबाद प्रमाणे गोरेगाव येथील काल भैरवनाथ जत्रा अनेक वर्षांपासून सुरु आहे.यावर्षी कालभैरवनाथाची जत्रा चैत्र चतुर्दशी मंगळवार ३१ मार्च  २०२६ रोजी आहे या जत्रेचा विशिष्ट आकर्षण म्हणजे उंच खांबावरील लाट फिरवणे हे असुन  या जत्रेमधील विशिष्ट मानाची काठी म्हणून भिनाडच्या काठीचा मोठा मान सन्मान असतो.       भिनाड गावाच्या काठीच्या मानामागे फार मोठा जुना इतिहास असुन तो इतिहास पूर्वीपासून चालत आलेली  प्रथा आहे. पूर्वी गोरेगावातील कालभैरवनाथाच्या जत्रेत लाट फिरवण्याच्या वेळी काही वाईट शक्ती अडथळा करत होत्या. तो इतिहास पूर्वीपासून असा सांगितला जातो की गोरेगावातील लाट फिरवत्या वेळी जो अडथळा येत होता तो दूर करण्यासाठी गोरेगावातील जानकार मंडळींनी काही आत्मज्ञान असलेल्या लोकांकडे विचारणा केली असता असे स...