द्वादशम हिंद केसरी बकासुराचे रोहा संभे येथील मैत्री चषक स्पर्धेत होणार आगमन,

 हजारो क्रिकेट खेळाडूंसह रसिक प्रेक्षकांना घडणार दर्शन!

कोलाड (श्याम लोखंडे) प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत गोवा रायडर्स ग्रुप आयोजित मैत्री चषक - २०२६ द्वादशम हिंदकेसरी देव याचे मैत्री चषक २०२६ क्रिकेटची पंढरी असलेल्या संभे मैदानावर शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता आगमन होत असल्याने क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंसह रसिक प्रेक्षक या साऱ्यांची उत्सुकता द्वादशम हिंद केसरी देव बकासुर याला पाहण्याची आणि त्याच्या दर्शनाची झाली आहे. 

रायगड रोहा तालुक्यातील पुगाव गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत मैत्री चषक व रोहा तालुका असोसिएशन प्रीमियर लीग चषक स्पर्धा १४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत पाच दिवस भव्य दिव्य रजनी प्रकाशझोतातील स्पर्धेचे दिमाखदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच उदघाटन सोहळा मंगळवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर व आयोजक प्रमोद म्हसकर आदी निमंत्रित प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते व साऱ्या क्रिकेट खेळाडू व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात झाले असून या मैदानावर क्रिकेटची रंगत धडाकेबाज फलंदाजांची फटकेबाजी  गोलंदाज यांच्या गोलंदाजीचा नजराणा रसिक प्रेक्षकांना बेधुंद करत आहेत त्यामुळे या सुरू असलेल्या प्रीमियर लीग मैत्री चषकला दररोज रसिक प्रेषक यांचा वाढता प्रतिसाद पहावयास मिळत असल्याचे दिसून येत आहे तर आज याच मैदानावर चक्क द्वादशम हिंद केसरी देव बकासुर याचा आगमन होत असल्याने त्याच्या आगमनाची जय्यत तयारी या मैदानार आयोजकांकडून करण्यात आल आहे.

द्वादशम हिंद केसरी बकासुर” हा भारतीय बैलगाडा शर्यतींमधील एक खूप नावाजलेला आणि गाजलेला बैल आहे, ज्याला “द्वादशम हिंद केसरी” म्हणजेच १२ व्या क्रमांकाचा हिंद केसरी म्हणून ओळखले जात आहे.बकासुर हा युग्मित बैलगाडा शर्यतींमध्ये भाग घेणारा एक अत्यंत प्रसिद्ध बैल आहे, ज्याचा मालक मोहिल धुमाळ (सुजगाव, मुळशी) म्हणून मोठा चर्चेत आहे. त्यामुळे 

त्याला “देव बकासुर” असेही संबोधले जाते, कारण त्याने अनेक हिंद केसरी मैदानांत धुरळा उडवत एक नंबर करून ख्याती मिळवली आहे. यामुळेच तो“द्वादशम हिंद केसरी”उदयास सुपरिचित आहे. या बकासुरने तब्बल १२ वेळा वेगवेगळ्या हिंद केसरी मैदानांत एक नंबर करून किंवा गटपास जिंकून त्याचा मान पटकावला आहे. 

पुसेगाव, कोरेगाव, पेडगाव, माळशिरस, वडकी, विकरवाडी आदी सारख्या प्रमुख हिंद केसरी मैदानांचा समावेश आहे. 

याची मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर बकासुर फक्त शर्यतीतच नव्हे तर सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतींचा चेहरा बनून गेला आहे; त्याच्या नावावर अनेक शॉर्ट्स, सॉन्ग्स आणि मुलाखे व्हिडिओ व्हायरल झालेचे पहावयास मिळत असून 

अजूनही नवीन हिंद केसरी/पारंपरिक मैदानांत बकासुर उतरत असल्यामुळे त्याला “द्वादशम हिंद केसरी बकासुर” असा एक नारा आणि टायटल म्हणून लोकप्रियपणे वापरला जातो.असा महान लोकप्रियता प्राप्त असलेला हिंद केसरी बकासुर यांचे आगमन आणि त्याचे दर्शन आज रोहा तालुक्यातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या संभेच्या मैदानावर सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात नाव लौकिक असलेले प्रमोद अनंत म्हसकर यांच्या माध्यमातून हजारो क्रिकेट खेळाडूंना आणि रसिक प्रेषक उपस्थितांना घडणार आहे.

यासाठी आयोजक प्रमोद म्हसकर आणि दिनेशशेठ पाशीलकर, संजय राजीवले, अनंद मोरे, रुपेश जांभेकर, प्रसाद चिनके, गणेश भोकटे, नंदुशेठ लोखंडे, हरेश सानप, नरेश सानप, आकाश कदम, गणेश सानप, छोटू सकपाळ, राहुल रॉक्सी, चिनु आंबडसकर सह पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog